नवीन लेखन...

‘खुलासा’ गोंधळ आणि गैरसमज वाढवणार्‍या गोष्टींचा

  • पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये…
  • पुर्णविरामांनी संपणारी आमची वाक्य् आता प्रश्नार्थक चिन्हांनी संपायला लागलीयेत, आयुष्यात पुढे सरकताना विराम कमी होत् असावेत् अन् प्रश्न वाढत् असावेत्… तसही आम्ही प्रश्नांनाच प्रामाणिक राहु कारण ऊत्तर शोधण्याचा हट्टीपणा आम्ही सोडलाये…
  • आदर्शांचा कंटाळा यायला लागल्यावर समजाव् की दुनियादारी शिकण्याची वेळ झाली…
  • आठवणी या ध्येय गाठलेल्याच्या कधीच नसतात, मात्र ध्येयापर्यंत जाण्याच्या नक्कीच असतात. ध्येयापर्यंत नेऊन सोडलेल्या मार्गांना मी कधी विसरू शकलो नाही, तुम्हीही नका विसरू कारण कुठल्याशा खुणेजवळ मीही ऊभा असलेला दिसेल तुम्हाला”
  • “तारक मेहता का ऊल्टा चष्मा” : एवढे रिकामे शेजारी खरच असतात का ओ!
  • शिकवायला आवडत् म्हणून बरेच जण् शिक्षक होतात्, खुप कालावधी नंतर त्यांना साक्षात्कार होतो की शिकवणे हे दुय्यम काम् असुन फायली नाचवणे हेच मुख्य कामे…
  • ब्रह्मज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण् आणि भुताटकी यावर काहीही बोलल् तरी खपत्… फक्त मधुन मधुन बोलता-बोलता एैकणारयाचे कान् घ्यावे…
  • कलेच्या सौंदर्यात ही अशी एक कालनिरपेक्ष आनंद देणारी शक्ति असते. कलावंत जाणुन घेण म्हणजे त्या शक्तिची लीला जाणुन घेणं असतं. असं स्थलकालनिरपेक्ष आनंद देण्याचं सामर्थ्य एक् तर निसर्गात असतं किंवा निसर्गासारख्याच सहजतेनं फुललेल्या कलेच्या दर्शनात…
  • विहिरींचे झरे ऊन्हाळ्यात आटतात. माणुसकीचे झरे या देशात कायमचे आटलेले आहेत. “जात” नावाच्या कल्पनेने ते आटवुन टाकले आहेत. जन्मल्याक्षणिच या देहाला चिकटवलेली ही जात् त्या देहाचे मढे झाले तरी सुटत नाही. कधी धार्मिक सत्तेच्या आधाराने- कधी राजकिय सत्तेसाठी संगनमताने – कधी स्वार्थासाठी जातीच्या टोळ्या बनवुन या देशात “जात” नावाचा अभिशाप चिरंजिव ठेवण्यात आम्ही नेहमिच पारंपारिक यश मिळवलये…
  • आयुष्य पुढे सरकताना काही दोर कापत जावे लागतात, आणि त्या दिशेची वाट आपल्याला बंद आहे हे ठरवावे लागते
  • “कपिल शर्मा शो”: हा हसायचा शो आहे का? , थोड् कन्फुज्ड होतो…
  • आपल्या अर्धवट बोलण्याने समोरच्याचा पुर्ण गैरसमज होण्याची शक्यता असते…
  • आजची पत्रकारिता, टेलिविजन वरच् जरनलिझम् आणि व्हाँट्सअँप एकाच माळेचे मणि आहेत, यांपैकी शब्दांमागच्या भावना कुणालाच जाणुन घ्यायची ईच्छा नसते ; पण् हे कुणि बोललेल्या किंवा लिहिलेल्या वाक्याचा सोईचा अर्थ काढायला एका अभिक्रीयाकारकाच काम् मात्र चोख बजावतात…
  • “साधु” स्वभाव शांततेचा, समानतेचा, सामावुन घेण्याचा प्रतिक होता, आज् त्याने लाल रंगाची झालर ओढलिये, कुंभात आम्ही एकमेकांवरच असंतुष्ट आहोत मग सामांन्यांच काय बोलायच… सदानुतन धर्माच पाईकत्व मिळाल्यापासुन आम्ही हा निर्णय करायला मोकळे झालो की आमच्या निर्मित्याच् दर्शन कुणी घ्यायच्, जरी आम्ही लाल रंगानी माखली आमचीच भुमी…
  • ब्रह्मांडला वाचवण्याची सगळी जबाबदारी हाँलिवुड चित्रपटांनी घेतल्यामुळे, आम्ही कोरड्या विहिरींमध्ये पाणी टाकुन-टाकुन ऊड्या मारतोय…
  • तुलनात्मक वरचढपणा आनंदाच् गमक आहे अस् बरयाच लोकांना वाटत् त्यासाठी त्यांचे अथक् मानसिक पृथक्करण सुरू असत, जेव्हा ते त्यात अयशस्वी होतात तेव्हा अस्वस्थतेची, निराशेची छटा त्यांच्या मनावर राज्य करायला ऊधृक्त होते
  • सैराट : नागराज पोपटराव मंजुळे, यांनी प्रेक्षकांचा केलेला पोपट अस् म्हणू शकतो आपण. कदाचित Arts, Commerce च्या मुला मुलींना आवडु शकतो पण् Engineering च्या विद्यार्थ्यांची मी Guarantee घेईल की ते निराश होतील हे प्रदर्शन पाहुन… मला कळत् नाही की मराठी मराठी म्हणून एवढा अभिमान का बाळगावा अशा भंगार चित्रपटाचा ज्यात् यत्कींचितही तर्कशुद्धता दिसत् नाही. तरूणांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण् आकर्षणाच्या आहारी जातोय का स्वत:च्या नि:स्सिम चेतनेच्या. आर्चि असो का परश्या ते कुठल्याच धर्माला, जातीला, अन् ना की ऊच्चनिचतेला साधर्म्य ठेवतात पण ते फक्त अतर्क्य अशा मानसिकतेला साधर्म्य ठेवतात ज्यांचा बळी समाज नक्कीच नाही घेणार् पण ते स्वत: मात्र “घेतिलच”…
  • माथ्यावरच्या रेषा, हातावरील रेषा अन् जिवनात भेटलेल्या अगणित् रेषा यांच्यातील प्रमेय सोडवण्याच्या भानगडीत आणि गणिताचे समिकरण् जुळवण्यात एवढ् अंतर चाललो की शेवटी जिथुन सुरू झालो तिथच् संपु की काय असा भास् झाला. पण मग् अपेक्षांच् ओझ् खाली ठेवताच् साक्षात्कार झाला की आपण कसल् अंतर गाठल् सापेक्षतेच की निरपेक्षतेच…
  • आम्ही प्रणालीसाठी मांडलेले ; विधायक प्रस्ताव सगळ्यांच्याच नजरेत् खरे ऊतरतील अस् स्वप्नातही येत् नाही आमच्या, कारण आम्हाला ठाऊक आहे की, काविळ झालेल्या पिवळ्या डोळ्यांना विधायकतेमध्ये देखिल “आरध्या हळदिकुंडात पिवळ् होण्याची लालसा असते”…
  • “मैं तो फुल्ल राजमा चावल् खाऊंगी, चिल्ड सेवन अपके साथ” या वाक्यातला प्रामाणिकपणा भावण्यासाठी एक असा आत्मकेंद्रीत विचार हवा जो, वस्तुस्थितीशी बिलकुलच् वस्तुनिष्ठ असल्याच् प्रमाण बाळगत् नसेल, ज्याला वस्तुस्थितीच ज्ञान नसेल, नाकी ज्याला समाजाभिमुख प्रक्रियांची कल्पना नसेल…”राजमा आणि भात्” चिवडुन प्रामाणिक होण्यापेक्षा आम्ही सावरकरांचे काळे पाणी पिण्यात धन्यता मानली असती…त्याने आम्ही राष्ट्रप्रेमी तर असतो आमच्याच नजरेत…
  • प्रत्येक धर्म “सत्य” हे त्याच धर्माच्या शिकवणुकीत आहे असे प्रतिपादन करतो. ईश्वराचा साक्षात्कार घडवून आणणारे तत्वज्ञानी, धर्मज्ञ, त्यांच्या गुरूंची, त्यांच्या शिकवणीची भलावण करीत असतात. खरे म्हणजे कोणत्याही एका धर्माच्या शिकवणुकीतुनच फक्त सत्याचा शोध लागणार आहे हि वृत्ति संपुर्ण पक्षपाती आहे आणि तरीही लहीनपणापासुन आपल्या प्रत्येकाच्या मनावर बिंबवली गेली आहे…
  • “फेटे, कर्कश्श् वाजणारा बँड, विचित्र आवाजात मंत्र म्हणनारा ब्राह्मण, मोहन थाळ, हिरव्या पत्तरवाळ्या, रणरणत्या ऊन्हात नाचणारा तरूण वर्ग अन् यासगळ्यांना झापडातुन अनुभवणारा घोडा आणि बिनझापडाचा नवरदेव” : हे सर्व जिथे एकत्र जमतात त्याला “लग्न” म्हणता येईल…
  • माणसाचा स्वभाव आणि आदर्श स्वभाव यात तफावत असते कारण स्वभाव स्व च्या प्रेमापोटी आदर्शांचा बळी देण्याचा “स्व भाव” आजपर्यंत चालत् आलेला आहे ; ज्याला “मी” देखिल अपवाद नाहिये.तसही “भाव्” ला किती भाव् द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.मग तो “स्व” चा का असेना…
  • आमच्या प्रश्न विचारण्याच्या आचरणाने वक्ते निर्माण होतांना भासमान झाले म्हणून; थोडे आवरले असता या वक्त्यांनी अचानक् पुढारयांच् रूप घेतल् अन् आम्हाला अगदी सामान्य व्यक्ति असल्याचा भास् परत् एकदा झाला
  • वास्तवाने होरपळणे अन् वास्तविक होरपळणे यात फरके…
  • साने गुरूजींच्या “1080 श्रेष्ठ सुविचारांचा संग्रह” या पुस्तकाची किंमत शंभर रूपये आहे, आणि भारताच्या फाळणिच्, किंवा हिटलर: द नाझिस्ट या पुस्तकांची किंमत चारशे रूपयापर्यंतये. आता ते वाचकावर अवलंबुन आहे की किंमत् कसली करायची: छापिल पुस्तकाची की “मानसिकतेची” …
  • काहींनी आम्हाला भेट् म्हणून दिलेले “खेळ” आम्हाला निखळतेने खेळताच आले नाहीत, कारण आम्ही खेळाला प्रामाणिक राहिलो नाकी “खेळ ज्यांकडुन मिळाला त्यांना” अन् त्यांनी बनवलेल्या “अतात्विक, अतर्क्य, असैद्घांतिक” अशा नियमांना…
  • IPL हा खेळला जाणारा खेळ आम्ही एवढा मोठ्ठा केला की आमच्यासोबत् खेळल्या जाणारया खेळाबद्दल आम्ही अगदी प्रेक्षकाप्रमाणे बघायला लागलो आणि आमच्याच समोर स्वत:चा हारलेला डाव् साजरा करायला लागलो…
  • वर्णावरचे विनोद ; विसाव्या शतकात देखिल व्हायरल होऊ शकतात हे पाहुन मला अपार खिंन्नता आली, पण आम्ही आमची तत्व वेशिस टांगली याचा भासही नसावा ही एक किव आणणारी गोष्ट आहे…म्हणून आम्हाला अमुक तारखेला सोम्या गोम्याच्या विचारांचा ऊमाळा येतो कारण् त्याच दिवशी ते तत्वद्नयान आम्हाला अचानक स्फुरत…
  • धर्मनिष्ठ आणि धर्मांध यात फरके, आदर्श हे जाणिवेतुन ऊपजतात नाकी जागृतीने, जाणिव आपल्याला धर्मनिष्ठ बनवते व् जागृती हि प्रचलित, अंध, अवैचारीकतेच् प्रतिनिधित्व करते ज्याला धर्मांध म्हणतात…
  • भावनेचा ऊच्चार “भा-वना्” असा केला गेला की भावना दुखावल्या जातात, वेदना “वे-दना” होऊन येते तेव्हा वेदना होतात आणि अपरिहार्य “अप-रिहार्य” होऊन आला किंवा असहकार “अस-हकार” झाला की राजकारण्यांच्या कलेपेक्षा, त्यांच्या “अ-कला” ऊघड्यावर पडल्यासारख्या वाटतात…
  • काही राष्ट्रवादाला प्रामाणिक राहतात, तर काही फक्त “वादा”ला, ज्यांना पुरोगामी म्हणून घ्यायला आवडत् त्यांना निष्क्रिय समाजाची स्वप्न पडत् आसावीत…जिथे मुद्दा मिळाला की लगेच विरोध सुरू… भरल्या पोटाचे दुखणे मनाच्या विकृतीत असते नाकी तात्विकतेत…
  • तात्विक दोष जाळु शकेल असा अग्नि खरच असता तर कित्ती छान झाल् असत्, आम्ही आमच्या भौतिकतेला चिकटले्ल्या दोषांना अस् गौरया अन् लाकड् जाळुन नसत् स्वत:च समाधान केल्… तसही आपल्या मांडीवर बसलेल्या प्रल्हाद ला दहन करण्यासाठी होलिकाने स्वत:च्या तात्विकतेचा बळी दिलाच नाही कधी, ती आजही जिवंतये… पण आम्हाला भौतिक दहनातच स्वारस्य आहे, कारण आम्हालाही होलिकाच् जिवंत ठेवायचीये
  • जेव्हा समुद्रापेक्षा लाटांना मोठ्या झाल्याचा भास होतो तेव्हा अगाध शिक्षण, शिल्, व्यक्तित्वातली ऊंची याला काहीच अर्थ ऊरत नाही,अन् तसही समुद्रासारख्या मोठ्यांच्या मोठेपणाच्या नाशातच लाटांसारख्या लहान्यांच्या “मोठेपणाचा” नाश असतोच
  • माझ्यातला “मी” जेव्हा संपत जातो तेव्हा पलिकडला “मी” विस्तारत जातो
  • आपण मांडलेली मत् ही कुठल्यातरी प्रणालीकडुन ग्राह्य किंवा अमान्य झालीत तर त्याला काहीतरी अर्थ राहिल किंवा कींमत राहिल… पण आपली मत् फक्त communicate करणार माध्यम असेल तर ते कुठलाही निर्णय द्यायला असमर्थ राहिल. म्हणून Facebook वर like करणे किंवा पाहुन सोडून देणे हे धोरण महत्वाच् आहे नाकी त्या पोस्ट वर आपल् सखोल अभ्यास पुर्ण वक्तव्य करण. तसही Social Community Websites या सोशिक जनतेच्या विचारांचा विपर्यास किंवा त्यांच्या चांगल्या विचारांच विघटन करण्यासाठीच बनल्या आहेत अस् माझ् प्रामाणिक मत आहे.संन्यास घेऊन आपण स्व कडे पोचणार असु तर नक्कीच घ्यावा ईतरांनी मात्र “निखिल वागळे” व्हायला काहिच हरकत नाहीये कारण त्याला एक Solid देणगीये समाजाभिमुखतेपासुन मुख चोरण्याची
  • पुर्वी तमाश्यातल्या नर्तकीच्या प्रेमाच्या पिंजरयात अडकलेले शिक्षक होते आताचे बिचारे शिक्षक AICTE, DTE, UGC, NAAC, NBA,MPSC, UPSC यांच्या विविध पिंजरयात अडकुन गेलेले आहेत जिथे त्यांच्यातला नायक मी स्वत:चा खुन केलाये अस् न् म्हणता या सर्वांनी मिळुन सरस्वतीला नासवलये अस् हताशपणे म्हणतोय…
  • विद्यार्थी हा एक असा शापित यक्ष असतो ज्याला “पालकांच्या स्वत:च्या आयुष्यात अपुरया ईच्छांची पुर्तता करण्याच्, शिक्षकाच्या स्वत:ला अशक्य ; अशा धोरणाच्या प्राप्तिच, आणि समाजाच्या मानसिक विक्रृतीच्या नादी ” न लागण्याच ; वेसण बांधुन घेण्याच कर्तव्य नशिबी आलये या आविर्भावात राहणारा एक प्राणीे…जो स्वत:च्या ईच्छा, स्वत:ची मत् अन् स्वत:च्या ऊपजत तत्वांना स्वाहा करण्याच सामर्थ्य ठेवतो
  • जेव्हा रेशिम हे किड्यांपासुन बनलेला एक धागाये ; हे कळल्यावर किडे हे किती महत्वाच काम् करतात याची प्रचिती येते… आपल्याला त्यांना सन्मुख राहावसच वाटत्… मग ते किडे मनातले का असेना…मात्र रेशिम बंध हे मनातल्या कीड्यांमुळेच तुटतात हे ही ध्यानात घेतल पाहिजे…
  • “शिवा” हे एक भौतिक तत्व आहे जे की सोमवारी सक्रीय असत् आणि महाशिवरात्री प्रकर्षाने जाणवत् म्हणून त्याच्या प्रत्ययासाठी थोडेसे तरी प्रयत्न करायला हवेत की जेणेकरुन आपण त्या देदीप्यमान तत्वाची प्रचिती करू शकु. शेवटी ते आपल्यावर आहे की हि संकल्पना आपण किती सैद्धांतिक घ्यायची, किती वैज्ञानिक घ्यायची, अन् किती अध्यात्मिक घ्यायची ते…
  • भावना अनावर झाल्यावर शब्दांच पाण्यात रूपांतर होत् असाव् ज्यांना “अश्रु” म्हणतात…
  • प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात! पण आम्ही प्रयत्न शब्दांनीच करायच ठरवलये मग का अपेक्षा एका डबड्यातुन बाहेर येण्याची करावी… आमचा डबडा पण फिक्से अन् तो कम्युनिटी वेबवरून वाजवणारा पण्, जर पोस्ट खरच क्रांति करत् असत्या तर गांधींनादेखिल् सामांन्यांचा पेहराव घेण्याची गरज पडली नसती…
  • व्हाँट्सअँप आणि Telegram  हा असा खेळ आहे ज्यात भावना अन् वापरल्या जाणारया स्माईली यात भलीमोठी तफावत आढळते. शेवटी soul to soul communication हेच खर असत म्हणून ज्याला ज्या भावना पोहोचायच्या त्या पोहोचतातच. त्यामुळे तुम्ही कितीही डोळ्यात पाणि आणि हसणारी स्माईली टाकली तरी समोरच्याला कळत की याच्या चेहरयावरची एकही सुरकुती हलली नसेल ते…
  • पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये…
  • महत्वाकांक्षा जपण्याकडचा कल वाढतोय समाजाचा संबंध जपण्यापेक्षा, बरये, जस श्री रामांना स्वत:च्या ईच्छा माराव्या लागल्या आदर्श राजा होण्यासाठी मग या समाजाने का नाई त्यांच्या ऊदाहरणाच सायटेशन चिकटवायच् स्वत:च्या कृतींच्या स्पष्टीकरणासाठी…
  • सुर्याला देखिल स्वत:तला अंधार त्याच्यापेक्षा मोठ्ठा कुणाकडेतरी सुपुर्द करावा लागत असणार एवढ् प्रकाशण्यासाठी…
  • माणूस ही एक, अनेक परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेली अजब वल्ली आहे. सारया मानवतेचा गहिवर काढणारया समाजसेवकाच सख्यांशी पटत नसत्! हे सारं सापेक्ष आहे. एखाद्या मजुर पुढारयाला हमालाशी हुज्जत घालताना कुणी पाहिल् तर नवल वाटणार नाही. त्यामुळे कुठलाही माणूस संपुर्णपणे जातीय, प्रांतीय, धर्मांध नसतो, शेवटी तो सोईस्कर रित्या बदलणारा अनित्य असतो…
  • “Intelligent Manipulation” हि एक अशी संकल्पना आहे जी आदर्शांचे वाभाडे काढायलाही मागेपुढे न पाहता, आदर्शांना अ:धम, अपुर्ण, अगम्य, अस्फुर्य हे विषेषण जोडायला नेहमिच ऊद्युक्त असते…
  • “खुलासा” हि गोष्टच गोंधळ आणि गैरसमज वाढवणारी असते कारण प्रत्येक व्यक्ति ही Shift of Origin वरती ऊभी असते अन् खुलास्यानंतर अजुनच शिफ्ट होते, मात्र Origin हा शुन्याच् प्रतिक नसुन स्थिर आधाराच् प्रतिक असतो…

 

प्रा. हितेशकुमार पटले
About प्रा. हितेशकुमार पटले 17 Articles
प्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..