नाट्य क्षेत्रात ‘अनंता काका’ या नावाने सुपरिचित असलेल्या जोशी यांनी बाबूराव गोखले यांच्या अनेक नाटकात काम केले.
‘करायला गेलो एक’, ‘देव नाही देव्हाऱ्यात’, ‘स्वयंसिद्धा’, ‘वेगळं व्हायचयं मला’, ‘वऱ्हाडी माणसं’ अशा अनेक नाटकांमधील भूमिकांसह त्यांनी केलेल्या स्त्री भूमिकाही गाजल्या. लोकनाट्यांमधूनही त्यांनी काम केले.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जोशी अनेक वर्षे कार्यरत होते. जनसंघ आणि भाजप पक्ष रुजविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. पुण्यातील लोकमान्यनगर भाडेकरू संघ आणि लोकमान्यनगर गणेशोत्सव मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते.
जोशी यांनी लिहिलेले आत्मचरित्र अप्रकाशित राहिले आहे.
अनंतराव जोशी यांचे १३ जून २०१९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply