ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचा जन्म १९१४ सालात झाला.
अदि फिरोजशहा मर्झबान हे त्यांचे पूर्ण नाव. १९५० च्या दशकात त्यांनी इंग्रजी व गुजराती भाषांमध्ये नाटकांचे लिखाण व दिग्दर्शित केली होती, त्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि तेथे त्यांनी थिएटरचे शिक्षण घेतले. तेथून परतल्यानंतर लगेचच ते भारतीय विद्या भवनमध्ये कला केंद्रात दाखल झाले. नंतर ते पारशी थिएटर साठी पूर्ण वेळ काम करू लागले.
आदि मार्जबान यांचा जन्म मुंबईतील गुजराती पारशी कुटुंबात कुटुंबात झाला. त्यांचे वडील फिरोजशाह जहांगीर मरझबन हे नाटककार आणि नाट्य व्यक्तिमत्त्व होते आणि आदिंनाही त्याच क्षेत्रात रस होता. एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी थिएटरच्या क्षेत्रात करियरबद्दल गांभीर्याने विचार करण्यास सुरूवात केली. त्या काळात पेसी खंडवाला यांच्याशी झालेली भेट ही त्यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरली आणि नंतर दोघांनी एकत्र काम करून अनेक नाटके केले.
सुरुवातीला त्यांनी वेस्टर्न इंडिया थिएटरमध्ये प्रसिद्धी अधिकारी म्हणून नोकरी केली, त्यानंतर काही काळ पत्रकारिता देखील केली. वर्तमानपत्र जाम-ए-जमशेद येथे काही काळ त्यांनी संपादकाची नोकरी केली.
१९६४ मध्ये पद्मश्री आणि १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
अदि मर्झबान यांचे २७ फेब्रुवारी १९८७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply