नवीन लेखन...

हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ कलाकार वहिदा रेहमान

गाईड, प्यासा, चौदहवीं का चाँद, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी वहिदा रेहमान यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३६ रोजी तामिळनाडूतील चेंगलपेट येथे झाला. वहिदा रेहमान यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र नशीबाने त्या बॉलिवूडमध्ये आल्या. वहीदा रहमान यांनी आपल्या बहिणीसोबत भरतनाट्यमचे धडे गुरु त्रीचुंबर मिनाक्षी सुंदरम पिल्लई आणि मुंबई येथे गुरु जयलक्ष्मी अल्वा यांच्या कडून घेतले होते. वाहिदांनी आपल्या करिअरची सुरुवात १९५५ मध्ये ‘राजूला मरायी’ या तेलगु चित्रपटापासून केली व या चित्रपटात त्यांना यशही मिळाले. त्यांनी आपली कारकीर्द तामीळ आणि तेलुगू सिनेमांपासून सुरू केली असली तरी त्यांच्या हिंदी सिनेमांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या. त्यांना त्यांच्या करिअरमधला मोठा ब्रेक ‘सीआयडी’ सिनेमात खलनायिकेच्या रुपात मिळाला. तामिळ सिनेमातील वहिदा यांचा जबरदस्त अभिनय बघून गुरुदत्त भारावले होते. अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या वहिदा यांना कमी वयामुळे चित्रपटाच्या करारावर सहीदेखील करण्यास कायद्याने मुभा नव्हती. परंतु, गुरूदत्त यांच्या नाव बदलण्याच्या सल्याला त्यांनी खंबिरपणे नकार दिला. त्यावेळी आपण खूप जिद्दी असल्याचे सांगत, या प्रसंगाची आठवण कथन करताना वहिदा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, दिलीप कुमार आणि अन्य कलाकारांचे उदाहरण देत चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी मला नावात बदलण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, मी खंबिरपणे यास नकार दिला. त्यांच्या मते माझे भले मोठे नाव न भावणारे होते. यामुळे स्वत्वाला ठेच पोहोचल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. वहिदाने नाव बदलण्यास सरळ सरळ नकार दिल्याने सीआयडी चित्रपटासाठी तिची निवड करण्यासाठी गुरूदत्त आणि राज खोसला यांना तीन दिवस लागले. वहीदा ह्या गुरुदत्त यांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत होत्या. हे दोघे आपल्या खासगी आयुष्यातही जवळ आले होते. ‘प्यासा’ या सिनेमानंतर रिलीज झालेला ‘कागज के फूल’ हा सिनेमा या दोघांच्या प्रेमावरच आधारित असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर या दोघांनी ‘चौदहवीं का चाँद’ आणि ‘साहिब बीबी और गुलाम’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. गुरुदत्त आणि वहीदा रहमान ही जोडी भारतीय सिनेमातील ऑन स्क्रिनवरील सर्वोत्कृष्ट जोड्यांपैकी एक होती. गुरुदत्त आणि वहीदा रहमान यांचे प्रेम उमलण्याआधीच कोमेजले. १० ऑक्टोबर १९६४ रोजी गुरुदत्त यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे वहीदा रहमान कोलमडून गेल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःला सावरत १९६५ साली ‘गाईड’ सिनेमात काम केले. हा सिनेमा तुफान गाजला होता. या सिनेमाला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ‘गाईड’नंतर १९६८ मध्ये रिलीज झालेल्या ‘नीलकमल’ या सिनेमाने वहीदा यांना यशोशिखरावर पोहोचवले. १९७४ साली त्यांनी अभिनेता कमलजीतबरोबर लग्न करुन आपला संसार थाटला. लग्नानंतर वहीदा बंगळूरूमध्ये स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुले आहेत. अनेक वर्षे सिनेमांमधून ब्रेक घेतल्यानंतर १९९१ साली ‘लम्हे’ या सिनेमाद्वारे त्या मोठ्या पडद्यावर परतल्या. २००० साली पतीच्या निधनामुळे त्यांना मोठा झटका बसला होता. मात्र पुन्हा एकदा स्वतःला सावरत त्यांनी ‘दिल्ली 6’ आणि ‘रंग दे बसंती’ या सिनेमांमध्ये काम केले. ‘गाइड’ आणि ‘साहेब बीबी और गुलाम’ या चित्रपटांतील सुंदर अभिनयामुळे नावाजलेल्या मा.वहीदा रहमान यांना भारत सरकारने १९७२ साली पद्मश्री आणि २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आले. वहीदा रहमान यांना गाईड व नील कमल या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार व रेशमा और शेरा या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपिडीया / इंटरनेट

वहीदा रहमान यांचे गाजलेले काही हिंदी सिनेमे.
साहब बीबी और गुलाम, कागज के फूल, कूली, गाईड, चौदहवी का चाँद, तीसरी कसम, नीलकमल, प्यासा, रेशमा और शेरा, सी.आय.डी., सोलवाँ साल, दिल्ली 6, रंग दे बसंती.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..