जेष्ठ गायिका मुबारक बेगम यांचा जन्म राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील सुजानगडमध्ये १९४० साली झाला.
लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, वाणी जयराम यांच्यासोबत मुबारक बेगम यांनी अनेक गाणी गायली, ती प्रचंड लोकप्रियही ठरली. मुबारक बेगम यांनी १९४९ मध्ये आईये या चित्रपटात लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. ‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटातील ‘कभी तनहाईयो में’ आणि १९६५ मधील ‘खूनी खजाना’ या चित्रपटातील ‘ए दिल बता हम कहाँ आ गये’ या गाण्यांनी त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली.
कैफी आझमी, एस.डी.बर्मन, मोहम्मद रफी, खय्याम, शंकर-जयकिशन या दिग्गजांसोबतही त्यांनी काम केले होते. ‘कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी’, ‘मुझको अपने गले लगा लो’, यासारखी मुबारक बेगम यांची काही यादगार गाणी आहेत. मुबारक बेगम यांनी १९४९ ते १९७२ या कालावधीत गायलेल्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
हिंदी आणि उर्दू गाण्यांसोबतच मुबारक बेगम यांनी अत्यंत ताकदीने पंजाबी, मारवाडी आणि गुजराती भाषांमध्येही गाणी गायली होती. १४६ चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे २०० हिंदी गाण्यांना. आपला सुमधूर आवाज दिला होता. हिंदी चित्रपटातील अनेक गाणी त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केली. सुनिल दत्त, नर्गिस आणि राजेंद्रकुमार अशा स्टार अभिनेत्यांच्या चित्रपटातील गाणी त्यांनी म्हटली
मुबारक बेगम यांचे १८ जुलै २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply