नवीन लेखन...

मराठी चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक अनंत माने

अनंत माने हे पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. त्यांचा जन्म २२ सप्टेंबर १९१५ रोजी झाला.

’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर चित्रपट रसिकांसमोर सादर केले.

अवघ्या ६० हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या ‘सांगते ऐका’ या तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला.

वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या “सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. त्या चित्रपटाला ‘चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान’ असे मानतात.

तमाशापट काढणारे अनंत माने असा शिक्का त्यांना बसला. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला एक दर्जा प्राप्त करुन दिला.

आज राजकीय पार्श्वभूमीवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट आपण पाहतो. या चित्रपटांची सुरुवातही त्यांनीच ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटात प्रथम केली. निळू फुले या चित्रपटातून सर्वप्रथम चित्रपटात आले आणि पुढार्‍याच्या भूमिकेचा चेहरा या चित्रपटाने दिला. त्यानंतर गल्ली ते दिल्लीपर्यंत राजकीय पार्श्वमभूमीवरील अनेक चित्रपट त्यांनी दिले.

सत्यकथेवरील आधारित मराठी चित्रपटही माने यांनी दिले. ‘चिमणी पाखरं’ची कथा ते राहत असलेल्या भगीरथ सदनमध्ये घडलेली कथा होती. ती त्यांनी धर्माधिकारी यांना सुचवली आणि त्यानंतर माने यांनी सत्यकथेवरील आधारित काही कथा चित्रपटात आणल्या.

त्यांचा ‘सुशीला’ हा चित्रपटदेखील त्यापैकी एक. त्या काळात कोल्हापुरात पद्मा, रॉयल, प्रभात, शाहू या चित्रपटगृहांच्या परिसरात तिकिटांचा काळाबाजार करणारी एक तरुणी दिसायची. तिची कथाच आपल्या चित्रपटाची कथा बनवून मानेंनी तो चित्रपट पडद्यावर आणला. ‘एक गाव बारा भानगडी’ हा त्यांचा चित्रपट राजकीय पार्श्वभूमीचा होता. याची कथा माझा मित्र अमृत गोरे याला वर्तमानपत्रातील एका बातमीतून सुचली होती. तीच त्याने चित्रपटात आणल्यानंतर वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेऊन तयार होणार्‍या पेपर कटिंग चित्रपटांचा ट्रेंड मराठी व हिंदी चित्रपटात आला. हिंदी चित्रपटात फ्लॅशबॅकने सुरुवात होणारे अनेक चित्रपट आपण पाहतो. नंतर सेमी फ्लॅशबॅक कथांवरील चित्रपटांचा नवा ट्रेंड चित्रपटात आला. गुलजार यांच्या ‘कोशिश’ या चित्रपटाच्या सेमी फ्लॅशबॅकसाठीच अनेकांनी कौतुक केले होते. परंतु गुलजार यांचा उदयही चित्रपटात झाला नव्हता, तेव्हा अनंत मानेंनी ५० च्या दशकात आपल्या ‘पुनवेची रात’ या चित्रपटात सेमी फ्लॅशबॅकचा प्रयोग सर्वप्रथम केला.

‘एक गाव बारा भानगडी’मधून मानेंनी निळू फुले यांना चित्रपटात पहिला ब्रेक दिलाच; पण अशा कित्येक कलावंतांना त्यांनी चित्रपटात पहिला ब्रेक दिला. राजा गोसावी, राजा परांजपे यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटापासून लोकांना माहीत झाला असला, तरी त्याआधी दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटात सर्वप्रथम दिसला. या चित्रपटासाठी मानेंनीच त्यांना हेरलं होतं. त्यांच्याबरोबर शरद तळवळकरांच्या रुपेरी जीवनाची सुरुवातही या चित्रपटातून झाली. मराठीत राजा गोसावी व शरद तळवळकर यांची जोडी जमली होती. ही जोडी मानेंनी त्यांच्या ‘दोन घडीचा डाव’ या चित्रपटातच सर्वप्रथम जमवलेली. जयश्री गडकर या ‘दिसतं तसं नसतं’ चित्रपटापासून दिसत असल्या तरी त्यांचं युग खर्याव अर्थाने मानेंच्या ‘सांगते ऐका’ चित्रपटापासून सुरू झाले. ‘सांगते ऐका’ आणि ‘मानिनी’ म्हणजे जयश्रीबाईंच्या रुपेरी जीवनाची हाईट होती. या हाईटला अनंत मानेंनीच त्यांना पोचवले. लीला गांधी (प्रीतीसंगम), उषा चव्हाण (केला इशारा जाता जाता), उषा नाईक (पाच रंगाची पाच पाखरं) यांसारख्या अनेक नायिका त्यांनी मराठी चित्रपटाला दिल्या.

’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

अनंत माने यांचे निधन ९ मे १९९५ रोजी झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इसाक मुजावर/ विकिपीडिया

 पूजा
poojapradhan323@gmail.com
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..