नवीन लेखन...

ज्येष्ठ संगीतकार खय्याम

मोहंमद जहूर खय्याम हाश्मी… त्यांना सारे जग प्रख्यात संगीतकार खय्याम या नावाने ओळखते.त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी जालंधरनजीकच्या राहों शहरात झाला.खय्यामम यांना संगीतकार बनायचे नसून अभिनेता बनायचे होते. ते दहा वर्षांचे असतानाच आपले गावातील घर सोडून दिल्लीयत राहणार्या काकांच्याेकडे आले. तेथेच राहून त्यांपनी आपल्या करिअर घडवण्याघची स्वयप्नेा बघितली. मुंबईत आल्याेनंतर त्यां च्याा करिअरला खर्याक अर्थाने सुरु झाली. मुंबईला आल्यावर ‘यह है जिंदगी’ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. १९४७ मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतरच्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी ‘शर्माजी’ या टोपणनावाने चार चित्रपटांना संगीतही दिले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या मा. खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान चांगले बसवले. त्यांनी चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नाहसच्या वर हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी कविता क्षेत्रात समकालीन आणि दिग्दज मंडळींसोबत काम केले आहे. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग, वालीसाहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर सुधियानवी यांचा विलक्षणीय प्रभाव जाणवतो. एकाहून एक श्रेष्ठ अश्या गीतकारांबरोबर खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. त्यामध्ये मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जां निसार अख्तर, शहरयार, गुलजार, नक्श लायलपुरी, हसन कमाल आदींचा समावेश आहे. हे गीतकार व खय्याम यांनी एकत्रितरीत्या केलेल्या कामाला प्रचंड यशही लाभले व लोकप्रियताही मिळाली. मा.खय्याम हे गेली ७० वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मा.खय्यायम यांनी ७० आणि ८०च्या दशकातील अतिशय श्रवणीय संगीत दिले. त्यांनी ‘त्रिशूल’, ‘थोडी सी बेवफाई’, ‘बाझार’, ‘कभी कभी’, ‘उमराव जान’, आणि ‘नूरी’सारख्या सिनेमांना संगीत दिले. वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताचे वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगीतकार खय्याम. व्यावसायिक यशासाठी झगडत असलेल्या मा.ख्ययाम यांच्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाची गाणी ऐकल्यावर राज कपूर यांनी ‘खय्यामसाहब अब आपकी सुबह हो गयी’ असे प्रेमाने म्हटले होते.प्यारका दर्द ही मीठा मिठा, कभी कभी मेरे दिल मे’ और दिल चीज क्या है या गाण्यांनी तरुण आणि वृद्ध लोकानाही वेड लावले होते. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. चार दशकाहून आपल्या आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांना मोहून मा. खय्याम टाकले होते. ’कभी कभी’, ‘बाजार’, ‘त्रिशूल’, ‘ नुरी’ ,‘आखरी खत’ अशा अनेक चित्रपटाना त्यांचा परीस स्पर्श लाभला होता. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २००७ साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तरप्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार व भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन मा.खय्यायम यांचा गौरव केला आहे. मा.खय्याम यांना उमराव जान व कभी कभी या चित्रपटासाठी तीन फिल्मफेयर पुरस्कार मिळाली होती. मा. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या पण गायिका होत्या. मा.जगजीत कौर यांनी नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी ‘खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी मा.खय्याम यांनी गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाला १२ कोटी रुपये देणगी दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तांत्रिक साहाय्य करणार्यांाना आर्थिक मदत केली जाणार आहे. या ट्रस्टमध्ये काही मान्यवरांना ट्रस्टीच्या रूपात जोडले जाईल. खय्याम यांच्या या दानशूरपणाचं कौतुक करू तेवढे कमी आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..