कविवर्य प्रा. शंकर वैद्य यांचा जन्म १५ जून १९२८ ओतूर पुणे येथे झाला. ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’,‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा’, ‘पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई’ अशा अनेक अजरामर शब्दरचनांनी काव्यरसिकांवर अनेक दशके गारूड करणारे प्रा. शंकर वैद्य यांना वयाच्या सहाव्या वर्षापासूनच कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते काव्यविश्वात रमले. ‘आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. तर ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल २७ वर्षांनी त्यांचा ‘दर्शन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा. शंकर वैद्य यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे नव्या लेखक, कवींबरोबरच विद्यार्थ्यांचा गोतावळा नेहमीच त्यांच्याभोवती असायचा. केवळ कवी म्हणूनच नव्हे तर उत्तम समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही ते सर्वपरिचित होते. शंकर वैद्य यांना तल्लख स्मरणशक्तीचे वरदान लाभले होते. त्यांचे सूत्रसंचालन हा साहित्य रसिकांसाठी अवर्णनीय अनुभव असायचा. भूतकाळातील काव्य लेखनाचे अनेक किस्से ते साहित्य रसिकांपुढे जसेच्या तसे उभे करायचे. ‘आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह.
२७ वर्षानंतर ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह त्यांनी प्रसिध्द केला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. अनेक वर्षे त्यांनी महाविद्यालयांमधून प्राध्यापकीही केली. शंकर वैद्य यांनी काव्य विश्वात स्वत:चा अमीट ठसा उमटवला होता. शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हदयांमुधुनी अरुणोदया झाला, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई या त्यांच्या कविता आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. कविता, कथांबरोबरच त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतेही लिहिली होती. “गोष्ट धमाल नाम्याची”, “चिमणराव गुंड्याभाऊ” या चित्रपटांतील गीते त्यांच्या लेखणीतून उतरली होती. कवी, गीतकार, सूत्रसंचालक, उत्तम वक्ता, समीक्षक, ललित लेखक असे ते बहुपेढी व्यक्तिमत्त्व होते.
शंकर वैद्य यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, कोकण मराठी साहित्य पुरस्कार, वाग्विलासिनी दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार, पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी सॅन होजे येथील पहिल्या विश्वय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. लेखिका व समीक्षक सरोजिनी वैद्य या त्यांच्या पत्नी. त्यांचीही जन्म तारीख ही १५ जूनच. सरोजिनीबाई मराठीच्या प्राध्यापिका आणि उत्तम समीक्षक होत्या. शंकर वैद्य यांचे २३ सप्टेंबर २०१४ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे शंकर वैद्य यांना आदरांजली.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply