भारताचे १५ वे उपराष्ट्रपती व भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकया नायडू यांचा जन्म १ जुलै १९४९ रोजी झाला. व्यंकय्या नायडू यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील नेल्लूर जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. दक्षिणेत भारतीय जनता पार्टीचा कधीच प्रभाव नव्हता. तिथे कधी सत्ता येईल, सत्तेची गोड फळे चाखायला मिळतील याची कोणतीही शाश्वती नसताना सत्तरच्या दशकात व्यंकय्या नायडू तत्कालीन जनसंघाकडे आकर्षित झाले. अर्थातच त्याला कारणीभूत ठरले अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रभावी भाषण. त्यांनी आंध्रमध्ये भाजपचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. युवा अवस्थेतच त्यांनी रस्त्यावर पोस्टर लावण्यापासूनची कामे केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. आणीबाणीच्या काळात त्यांना अटकही झाली होती. आंध्र प्रदेशात भाजपची ताकद फारशी वाढू शकली नाही. ते आंध्र प्रदेश विधानसभेत दोनदा निवडून गेले आहेत. पण ते लोकसभेत कधीही निवडून गेले नाहीत. मात्र कर्नाटकमधून त्यांना तीन वेळा राज्यसभेत पाठविण्यात आले. २०१४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते, ते राजस्थानचे प्रतिनिधित्व करत होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नायडू हे ग्रामविकास मंत्री होते. जुलै २००४ ते ऑक्टोबर २००४ पर्यंत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण २००४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपद सोडले होते. पण २०१४ साली मोदी सरकारमध्ये त्यांना नगरविकास खात्यासारखे महत्त्वाचे खाते देण्यात आले.
नायडू माहिती आणि प्रसारण, नगरविकास, संसदीय कार्य आदी खात्यांचे मंत्री म्हणून कारभार पाहत होते. शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी राजकारणात मिळविलेले यश हे महत्त्वाचे मानले जाते. रस्त्यावर पोस्टर चिकटविणारा कार्यकर्ता ते उपराष्ट्रपती हा त्यांचा प्रवास खडतर होता. एक सालस व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. २०१८ मध्ये व्यंकया नायडू यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाली.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply