विचार आतला,
काळोख दाटला,
उजळत्या घरां,
आत्मा पाहिला,–!!!
चिंता दु:खे,
बोचरी सुखे,
विलक्षण खंता,
हृदयाला भिडतां,–!!!
मी तूपणा गळतां,
अंतरात्मा छळता,
प्राणातील परमात्मा,
मोक्ष मागतां,–!!!
जीव सुटेना,
कर्मात,भोगात,
अडकून राहिला,
दार उघडतां,–!!!
मुक्काम बदलतां,
नसते हातां,
व्यथा हृदयां,
जिवा छळतां,–!!!
स्वर्ग-नरक,
कल्पना नुसत्या,
माणसांच्या वस्त्या, नकोशा-नकोशा,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply