विचार, भावना अंतरज्ञान,
संगत असते तिन्हीची
यशस्वी करण्याजीवन,
मदत लागते सर्वांची….१
तर्कशुद्धता ठरण्यासाठी,
विसंगतीचा घेई आधार
जीवनाचे सत्य उकलण्या,
बुद्धी करीत राही विचार…२,
राग लोभ प्रेमादी गुण,
जीवनाची चमकती अंगे,
‘भावनेचा’ आविष्कार होतां,
एकत्र सर्वां चालण्या सांगे….३,
शोध घेत असता सत्याचा,
अनेक अडचणी येती,
सत्य हेच असूनी ईश्वर,
अंतरज्ञान तेच पटविती….४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
लेखकाचे नाव :
डॉ. भगवान नागापूरकर
लेखकाचा ई-मेल :
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply