१)तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली, यावरून तुमची श्रीमंती कळते. …………विचार
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली, (हल्ली कलियुगामध्ये ती कशाप्रकारे जोडली जातात हे महत्वाचे मानले जात नाही) यावरून तुमची श्रीमंती कळते. (कलियुगामध्ये हि श्रीमंती फक्त आर्थिक स्वरूपाचीच असते, मनाची नसते.)
२)मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून, कधी आणि कसा येईल हे सांगता येणार नाही. ………विचार
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी आणि कसा येईल हे सांगता येणार नाही. (मनाचे दरवाजेचच उघडे ठेवू नका, तर त्यामधून येणा-या प्रकाशाला आत्मसात करावयास शिका आणि त्यावर अंमलबजावणी करावयास लागा, तर आणि तरच यश तुमचे होईल.)
३)जगण्यात मौज आहेच. पण त्याहूनही अधिक मौज फुलण्यात आहे. ………विचार
जगण्यात मौज आहेच, पण त्याहूनही अधिक मौज फुलण्यात आहे. (नुसते फुलासारखे फुलून कोमेजून जावू नका, तर जगाला आपल्या कामाचा सुगंध येवू द्या. त्या सुगंधाचा आनंद जगाला घेवू द्या. याचाच अर्थ आपण आपल्या स्वत:ला, जगाला समर्पित करा.)
४) लखलखते तारे पाहण्यासाठी, आपल्याला अंधारातच राहावं लागतं. …..विचार
लखलखते तारे पाहण्यासाठी, आपल्याला अंधारातच राहावं लागतं. (तुम्हीच ते लखलखते तारे होवून जगाला धृव ता-यासारखी दिशा का नाही दाखवत? म्हणजे तुम्हाला अंधारात राहव लागणार नाही. तुम्ही जगाला दिशा दाखवू शकाल.)
५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुस-याचा वापर कधी करू नका. ……. विचार
स्वत:च्या स्वार्थासाठी, दुस-याचा वापर कधी करू नका. (तुम्ही स्वार्थच करू नका. करा तो फक्त नि:स्वार्थ आणि स्वार्थच करावयाचा झाल्यास, त्या भगवंताच्या दर्शनाचा स्वार्थ करा. तोच तुम्हाला या भवसागरातून पार होण्याचा मार्ग दाखवील. म्हणजेच तुम्हाला तुमचा स्वार्थ साधण्यासाठी दुस-याचा वापर करावयाची गरजच भासणार नाही.)
६)आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचे प्रदर्शन करू नका. …… विचार
आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचे प्रदर्शन करू नका. (प्रदर्शन केल्यास, आपल्या रूपाचे खरे दर्शन सर्वस्वाना होईल. आणि म्हणूनच ते होवू नये असे जर आपणास वाटत असेल, तर ते टाळा.)
७) भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो. भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो. …..
भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो. भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो. (भूतकाळातील आठवणींचा आनंद घेताना तो दुस-यांनाही देण्याचा प्रयत्न करा. तसेच भविष्यातील स्वप्नांचा आनंद उपभोगताना तो दुस-यांसाठी कसा देता येईल याचा विचार करा. वर्तमानकाळ आयुष्याचा आनंद देतो हे खरे. पण फक्त आनंदच उपभोगीत बसू नका, तर तो दुस-यालाही देण्याचा प्रयत्न करा. दुस-याला आनंद देता देता त्यातच आपला आनंद माना.)
८)पोहरा झूकल्याशिवाय विहिरीतील पाणी पोह-यात जात नाही. …..विचार
पोहरा झूकल्याशिवाय विहिरीतील पाणी पोह-यात जात नाही. (ह्यापासून आपणांस एकच शिक्षण मिळते, ते म्हणजे नेहमी लीन रहा आणि जीवनात सर्वस्व लीनतेने मिळविण्याचा प्रयत्न करा.)
९)मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुख:दायक असतो. …….विचार
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुख:दायक असतो. (हे जरी खरे असले, तरी मित्र आणि मैत्री इतकी वाढवा की दुख: करायला वेळच शिल्लक राहू देवू नका. मृत्यू शाश्वत आहे, तर मैत्री अशाश्वत, चिरंतन आहे, ह्याचा प्रत्यय सर्वस्वाना येवू द्या.)
१०)अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात. ………विचार
अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात. (अत्तर जरी सुगंधी असले, तरी ते सगळ्याच फुलांचे होत नाही. म्हणून ते होण्यासाठी आपल्या कर्तृत्वाचा सुगंध असा दरवळू द्या की तो सर्वत्र अत्तराच्या सुगंधासारखा सर्वदूर पसरू द्या.)
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply