नवीन लेखन...

विचारांचा उपवास

मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. आधुनिक युगामध्ये प्रगती करणारा मानव अनेकानेक सुख-सुविधांनी स्वतः ला संपन्न करण्यासाठी कार्यशील असतो. प्रत्येक जण स्वतः ला सर्वोपरी भरपूर होण्याची इच्छा बाळगतो, ह्या इच्छांचा कुठे ही अंत नाही. एकाची पूर्ती झाली की लगेच दुसरी इच्छा जन्म गेले. कधी-कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्या अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्या ह्या अट्टाहासापोटी आपण उपवास करत राहतो . कधी सोळा सोमवार तर कधी अकरा मंगळवार तर कधी आणि काही ———- खरंच असे उपवास करून आपल्या ह्या इच्छा पूर्ण होऊ शकतात का ?

उपवास म्हणजे काय ? तो कोणत्या प्रकारचा असावा हे जाणून घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी परंपरागत चालत आल्या या त्याचा आपण अंगीकार केला . आज ही काही श्रद्धाळू माणसे, उपवास म्हणजे काही खाद्य पदार्थ तसेच पेय ह्यांचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशीन आहे त्याला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. जसं पिठाच्या गिरणीला सुद्धा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवले जाते त्याचप्रमाणे आपल्या पोटाला सुद्धा एक दिवस विश्रांती मिळावी ह्या हेतूने उपवास केला जायचा जेणे करून ह्या शरीररूपी मशीनचं ऑइलिंग (oiling) आणि क्लीनिंग (clining) होऊ शकेल.

मनोविज्ञानामध्ये सांगितले जाते की जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले तर ती गोष्ट वृद्धीस पावते. ज्याला आपण संकल्पशक्ति असे सुद्धा म्हणू शकतो. आज थोडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली तर हे प्रकर्षाने जाणून येते की हे मन काही क्षणासाठी सुद्धा स्थिर राहत नाही. मनाच्या एकाग्रतेची कमी असल्याचे दिसून येते. मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात. पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर तसेच जीवनावर ही होतो. जर स्वतः ला भाग्यशाली किंवा सुखी-समाधानी बनवू इच्छित असाल तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.

प्रत्येक समस्येचे, दुःखाचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. जसे एखादा आजार ठीक करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा आपण वापर करतो पण आजाराला मुळापासून नष्ट करण्यासाठी कडू औषधे तसेच रोजच्या रोज काही नियम पाळले जातात. त्याचप्रमाणे दुःखांना, समस्यांना नष्ट करण्यासाठी आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त करण्यासाठी विचारांना सकारात्मक दिशा देणे तितकेच महत्वाचे आहे. पूर्ण दिवस कदाचित सकारात्मक दिशा देणे तितकेच महत्वाचे आहे. पूर्ण दिवस कदाचित सकारात्मक राहणे हे खूप मोठे आव्हान (challenge) असू शकेल. पण दिवसभरामध्ये फक्त एक तास आपण नियमितपणे मनाला सकारात्मक विचारांनी भरण्याचा प्रयत्न अवश्य करावा. हा तासाभराचा अभ्यास ही मनाला सुखद तसेच शक्तिशाली बनवण्यास मदत करू शकतो.

शरीर कार्यरत ठेवण्यासाठी जसं अन्न ग्रहणाच्या दिवसातल्या तीन ते चार वेळा आपण निश्चित करतो. ह्या अन्न पदार्थाद्वारे शरीराला आवश्यक अशी सर्व जीवनसत्वे मिळावी ह्यावर विशेष लक्ष्य दिले जाते. त्याचप्रमाणे मनाला आवश्यक असणारे पवित्र, शक्तिशाली तसेच सुविचारांची सुद्धा वेळ निश्चित करावी जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये यावी.

आपल्या विचारांचा शरीरावर खूप मोठा प्रभाव पडतो हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच मनाची तार ईश्वराशी जोडून विचारांची शुद्धी सतत करत राहणे हे आवश्यक आहे. भक्तिमार्गामध्ये उपवास तोच करू शकतो ज्याची ईश्वरावर श्रद्धा तसेच विश्वास आहे. विचारांचा उपवास म्हणजे प्रत्येक विचार स्व-स्मृतीत तसेच ईश्वरस्मृतीमध्ये राहून करणे. थोडक्यात म्हणजे विचारांद्वारे ईश्वराबरोबर केलेला वास म्हणजेच विचारांचा उपवास.

जीवनरुपी गाडीचे विचार हे चालक आहेत. ज्या दिशेने हे विचार जातील त्या अनुसार आपले जीवन बनेल. ह्या वस्तुस्थितीला समजणे महत्वपूर्ण आहे. आज आपल्या जीवनामध्ये अपयश, दुःख, निराशा, समस्या असतील तर त्याचे कारण आपले विचारच आहेत. म्हणून प्रत्येक विचारांवर नजर ठेवली तर नक्कीच आपणास सर्व प्राप्ती होऊ लागतील. म्हणूनच म्हटले आहे – ‘ विचार हेच जीवन आहे ’. सारांशाने विचारांचा उपवास अर्थात नकारात्मक विचारांना मनात थारा न देता, सदैव चांगल्या विचारांचा स्वीकार करणे होय .

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

2 Comments on विचारांचा उपवास

  1. आपण समाजासाठी अतिशय चांगले कार्य करत आहात. सध्या लोकांना मानसिक आरोग्याची खूप आवश्यकता आहे. तसेच आपल्यासारख्या अनुभवी आध्यात्मिक गुरूंचीही सगळ्यांना गरज आहे.आपल्या या कार्यास व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..