नवीन लेखन...

विचारांची किमया

आपले जीवन एक प्रयोगशाळा आहे. रोज नव नवीन अनुभव घेण्यासाठी विचारांची दिशा बदलून पहावी. कारण जसे विचार तसे जीवन हे समीकरण आहे. त्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागेल तरच खरी मजा आहे. शालेय जीवनामध्ये एखादे कठिण समीकरण सोडवले की प्रचंड आनंद व्हायचा. जीवनाच ही तसेच आहे. एखाद्या किचकट परिस्थिती तून खूप कमी वेळात बाहेर पडले की हायसे वाटते. पण ही किमया काय आहे हे जाणून घेऊ या.

बाह्यजगामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक वस्तूची निर्मिती पहिली अंतर्जगामध्ये होते अर्थातच विचारांमध्ये त्याची निर्मिती होते. वारंवार एकाच प्रकारचे संकल्प मनात चालत असतील तर ते वास्तवात यायला वेळ लागत नाही. मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. कधी-कधी आपण बोलून जातो की ‘ ज्या गोष्टीची मला भीती होती तेच घडलं.’ पण हे लक्षात असू द्या कोणती ही गोष्ट योगायोगाने वा अचानक होत नाही. आपल्या अंतर्मनामध्ये त्या घटनेचे निर्माण आपण कधीतरी केले होते, तेच वास्तवात आले आहे. म्हणून निरर्थक किंवा वाईट गोष्टींचे चित्र मनात रंगवू नये. कारण आपल्या अंतर्मनाला ‘नाही’ ह्या शब्दाची भाषा समजत नाही. आपण ज्या गोष्टीवर जोर देतो ते वास्तवात येते.

आज आपण वर्तमानपत्राद्वारे, टेलिव्हिजनद्वारे किंवा सभोवताली अनेक घटना होताना ऐकतो, बघतो. दुसऱ्यावर ओढवलेला प्रसंग माझ्या जीवनात तर येणार नाही ना? याची भीती नेहमीच आपल्याला असते. अश्या प्रसंगाचे चिंतन आपण जर वारंवार करत असू तर ते प्रसंग आपल्या जीवनात ही घडू शकतात कारण विचारांच्या माध्यमाने आपण त्या व्यक्तींना, घटनांना आपल्या जीवनात निमंत्रण देत असतो. जसे आपल्या जिवलग मित्र-संबंधीला जर एखादा आजार झाला असेल व आपण मनामध्ये सतत विचार करत असू की हा आजार मला तर नाही ना होणार …… काही वर्षानंतर तो आजार आपल्याला जडलेला आपण अनुभवू शकतो.

समजा काही कारणास्तव आज ऑफीसला जायला उशीर झाला आहे, घरातून निघताना मनात विचार येत असतील की आज तर ट्रेन सुटणार, ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर होणार, बॉसचा ओरडा खावा लागणार …….. असे नकारात्मक विचार सतत येत असतील तर तेच साकार होताना आढळतील. कारण विचारांमार्फत आपण आपल्या भविष्यातील घटनांना आकर्षित करतो. हेच विचार सकारात्मकतेकडे वळवले तर त्या घटनांना सुद्धा आकर्षित करू शकतो.

आपल्या जीवनात मिळालेले संबंधी, शरीर, धन ह्या सर्वांना आपण विचाराद्वारे रूप देत असतो. अजाणतेपणाने केलेला व्यर्थ संकल्प ही साकार रूप धारण करू शकतो याची काळजी घ्यावी. ‘ का कोणास ठाऊक नेहमी माझ्याच बरोबर असे का होते, मलाच अशी लोकं का भेटतात ……’ अशा विचारांना थोडा आळा घालून मनाला प्रशिक्षित करा. रोज सकारात्मक सूचना स्वतःला द्या की ‘ आजचा दिवस माझा खूप उत्साहाने, सफलतेने भरलेला आहे. माझे प्रियजन मला भेटणार आहेत. माझे प्रत्येक कार्य कुशल आणि सफल होत आहे. जीवनाचे संपूर्ण सुख मला मिळत आहे. माझे शरीर, संबंध, योजना सर्व काही माझ्या इच्छेनुसार घडत आहेत. मी खूप सुखी, आनंदी आहे.’ अश्याप्रकाराचे विचार रोज सकाळी निर्माण केले तर त्याचा प्रभाव दिवसभरात आपण बघू शकतो.

आपले विचार आपल्या जीवनाचे चालक आहेत. ते ज्या दिशेने घेऊन जातील त्या अनुसार आपले जीवन घडत जाईल. ह्या संकल्पांच्या नियमांना ध्यानी ठेवूनच आपण त्याची रचना करावी. जसे भविष्याचे सुंदर स्वप्न मनामध्ये रंगवाल, रोज त्या स्वप्नांना साकार होताना अनुभव कराल तसंतसे ते वास्तविकतेमध्ये होताना जाणवेल. कधी-कधी मस्करीमध्ये पण आपण बोलून जायचे ‘ सोचने में क्या जाता है ?’ खरंच स्वतःबद्दल छान-छान विचार करायला काय जाते ? कल्पनाशक्ती प्रबळ बनवा.

जे आपल्या कल्पनेमध्ये उतरू शकत नाही ते वास्तविकतेमध्ये कसे होईल ? म्हणूनच असंभव कार्य संभव करण्यासाठी पहिले ते कल्पनेमध्ये अनेकदा होताना बघितले तर ते प्रत्यक्ष कसे व्हावे हा विचार आपल्याला करण्याची गरज नाही. संकल्पांची शक्ती ते असंभव कार्य होण्यासाठी सर्व गोष्टींची सुरेल मांडणी करून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करील. फक्त आपण संकल्पांची पकड सोडता कामा नये.

आपले संकल्प आपल्या जीवनाचा सर्वात मोठा हिस्सा आहेत. अंतर्मनाने ज्या गोष्टींना सत्य समजले त्या गोष्टी आपल्या निकट भविष्यामध्ये साकार होतील. ह्या संकल्पाद्वारे आपले शरीर, संबंध, घटना ……. ह्या सर्वांचे रूप आपण बदलू शकतो. पण थोडेसे धैर्य ठेवावे. कारण संकल्प एक बीज आहे त्याला फळीभूत व्हायला वेळ हा लागतो. सतत दृढतेचे पाणी देत राहिले तर ह्या विचारांची किमया काय आहे ते स्वतःच अनुभव कराल.

— ब्रह्माकुमारी नीता.

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..