भारतामध्ये १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी म्हणजे १६ डिसेंबर १९७१ साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता. भारत-पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या दुस-या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर पाकिस्तानने अक्षरश: गुडघे टेकत शरणागती पत्करली होती. पाकिस्तानी लष्कराच्या पूर्व कमांडने शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर हे युद्ध समाप्त झाले.
भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाला आज ५० वर्ष पूर्ण झाली. या युद्धातून एका नव्या देशाची बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यावेळी भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे लेफ्टनंट जनरल जे.एस.अरोरा प्रमुख होते. शेख मुजीबूर रहमान यांच्या अध्यक्षतेखालील आवामी पक्षाने पूर्व पाकिस्तानात (युद्धाच्या आधीच्या पाकिस्तानात) मिळवलेल्या विजयामुळे युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. त्यावेळी पश्चिम पाकिस्तानात झुल्फीकार अली भुत्तो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी मोठा पक्ष होता. त्यावेळी भुत्तोंनी जनरल याहया खान यांनी मुजीबूर यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले तर, संसदेवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. या दरम्यान पाकिस्तानी लष्कराचे पूर्व पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणावर अत्याचार सुरु होते.
बांगलादेशातून जवळपास १ कोटी लोक आश्रयाला भारतात आले होते. जर असेच सुरु राहिले असते भारतात असंतोष वाढला असता त्यामुळे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना युद्धाचा निर्णय घ्यावा लागला. अखेर ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हवाई दलाच्या ११ तळांवर हवाई हल्ले केले आणि युद्धा तोंड फुटले. भारतीय सैन्याने फक्त १३ दिवसात पाकिस्तानला लोळवून नवा इतिहास रचला.
दोन देशांमधील इतिहासातील हे सर्वात छोटे युद्ध आहे. ९० ते ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना भारतीय लष्कराने कैद केले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply