एक होता आंधळा. एक होता पांगळा. दोघेही एका देवळासमोर भिक मागत असत. अगदी सुरवातीला त्यांच्यात सख्य नव्हते. दोघेही वेगवेगळे बसून भिक्षा मागत. आंधळ्याला डोळे नसल्यामुळे लोक भिक्षा घालत. आंधळा अंदाजाने भिक्षा मोजत असे. पांगळा एकाच ठिकाणी बसून असे. त्याला भिक्षा कमी मिळे.
एके दिवशी पांगळा आंधळ्याला म्हणाला, आपण एकत्र भिक्षा मागू. त्यामुळे आपल्या दोघांचा फायदा नक्की होईल. तू मला उचलून घे. मी तुला कुठे जायचे ते सांगीन.
आंधळ्यांने मान्य केले. त्याने पांगळ्याला आपल्या खांद्यावर घेतला. दोघे मिळून भिक्षा मागू लागले. भिक्षा भरपूर मिळू लागली. आंधळा खुश झाला.
असे काही दिवस गेले. एकंदर दोघांचे बरे चालले होते. पण चालताना आंधळ्याला पांगळा जरा जड वाटू लागला. पांगळा चांगलाच तब्बेतीने सुधारत होता. आंधळ्याला संशय आला. आपल्याला दिसत नाही याचा फायदा तर हा पांगळा घेत नाही ना? आंधळा बैचेन झाला. कधी एकदा खांद्यावर घेतलेला पांगळा फेकून देतोय असे त्याला झाले. पण पांगळा आता आंधळ्याच्या खांद्यावरून उतरायला तयार नाही.
सहन होत नाही आणि सांगताही येत नाही …..काय करावे बरे आंधळ्याने ?
— चिंतामणी कारखानीस
गोष्ट ठिक आहे, पण् विदर्भ ना लंगडा पांगळा आहे ना आंधळा.