रूद्राक्षाच्या माळा घालूनी,
भस्म लाविले सर्वांगाला,
वेषभूषा साधू जनाची,
शोभूनी दिसली शरीराला ।।१।।
खर्ची घातला बहूत वेळ,
रूप सजविण्या साधूचे,
एक चित्त झाला होता,
देहा भोंवती लक्ष तयाचे ।।२।।
शरीरांनी जरी निर्मळ होता,
चंचल होते मन त्याचे,
प्रभू मार्गास महत्त्व देतां,
विसरे तोच चरण प्रभूचे ।।३।।
विधी कर्मात वेळ दवडता,
प्रभू सेवेसी राहील काय ?,
देहाच्या हालचाली बघूनी,
समाधानी तुम्हीं होत जाय ।।४।।
सोडून द्या हे सारे सारे,
जे मनास गुंतवी भलतीकडे,
केवळ तुमचे शांत चित्त,
नेईल तुम्हां ध्येयाकडे ।।५।।
— डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply