नवीन लेखन...

विज्ञान मराठी : पारिभाषिक संज्ञा

रविवार 26 ऑक्टोबर 1975 च्या महाराष्ट्र टाअीम्समध्ये माझा ‘हार्दिक लयसंयोजक’ “CARDIAC PACEMAKER” हा लेख प्रसिद्ध झाला. आशयप्रधान परिभाषेचा पाठपुरावा करताना आता असं लक्षात आलं की ‘लय संयोजक’ हा शब्द बरोबर होता पण ‘हार्दिक’ हा शब्द तितकासा चपखल नाही. Hearty या शब्दासाठी मराठीत हार्दिक हा शब्द आपण वापरतो. शुभप्रसंगी अुत्सवव्यक्तीचं आपण हार्दिक अभिनंदन करतो. म्हणजे मनापासूनचं, हृदयापासूनचं असा भावनिक अर्थ हार्दिक या शब्दाला आहे.
मी लेख लिहिला होता “CARDIAC PACEMAKER” या वैद्यकीय अुपकरणासंबंधी. “CARDIAC” शब्दाचा संबंध हृदय या अवयवाशी आहे. त्यात भावनांचा संबंध येत नाही. म्हणूनच कार्डियाक या अिंग्रजी शब्दास आशयप्रधान परिभाषेत ‘हृदयिक’ हा शब्द जास्त चपखल वाटतो.
पूर्णिमा ही भारताची पाचवी संशोधन अणुभट्टी जेव्हा कार्यान्वित झाली (18 मे 1972)बहुतेक बुद्ध पौर्णिमा असावी !! आता ही अणुभट्टी बंद केली आहे) तेव्हा वृत्तपत्रांना बातमी देताना PURNIMA BECAME CRITICAL असा शब्दप्रयोग केला असावा. अेखाद्या व्यक्तीची प्रकृती CRITICAL झाली म्हणजे तिला अिस्पितळाच्या अतीदक्षता विभागात ठेवतात. क्रिटीकल या शब्दाचा आशय विचारात न घेता अेका मराठी वृत्तपत्रानं त्यावेळी बातमी दिली ”पूर्णिमा अणुभट्टी नाजुकावस्थेत गेली.
PURNIMA हा शब्द PLUTONIUM REACTOR FOR NEUTRONIC INVESTIGATIONS OF MULTYPLYING ASSEMBLIES यातील आद्याक्षरं घेअून घडविला आहे. दहावीच्या पाठ्ययपुस्तकात ‘पौर्णिमा’ अणुभट्टी असा अुल्लेख केला आहे. पूर्णिमा हा घडविलेला शब्द असल्यामुळे त्याचं पौर्णिमा किंवा पूनव असं रूपांतर करणं संयुक्तिक नाही.
‘सुअी पटक सन्नाटा’ हे पिन ड्रॉप सायलेन्स, या शब्दसमुहाचं हिन्दी भाषांतर आहे. मराठीत असा प्रयत्न करू नये असं वाटतं. परीक्षेच्या हॉलमध्ये किंवा स्मशानात अशीच शांतता असते. म्हणूनच आशयप्रधान परिभाषेचं अुद्दिष्ट समोर ठेवून पिन ड्रॉप सायलेन्स या शब्द समुहासाठी ‘परीक्षा कक्ष शांतता (शांती नव्हे) किंवा स्मशान शांतता असा शब्दप्रयोग करावा.
डॉ. रघुवीर यांनी NECK TIE या शब्दासाठी ‘कंठ लंगोट’ हा शब्द सुचविला होता. अर्थाअर्थी हा शब्द बरोबर असला तरी तो विनोदीच वाटतो. त्याअैवजी ‘ग्रीवा बंध’ हा शब्द जास्त चपखल वाटतो. कंठ किंवा गळा हा शब्द ध्वनी निर्माण करणार्या आणि मानेच्या आतील अवयवांशी संबंधीत आहेत.
खरं म्हणजे नेकटाय हाच शब्द सोयीचा वाटतो.
मोठ्या वृक्षाचं लहान प्रतिरूप करणाऱ्या जपानी बोन्साय पद्धतीस ‘वामनीकरण पद्धती’ हा शब्द वापरावा आणि त्या वृक्षाला ‘वामनवृक्ष’ असं म्हणावं. ‘नरिमन पॉअींट’ याचं भाषांतर ‘नरिमन बिंदू’ असं न करता ‘नरिमन भूशिर’ असं करावं किंवा नरिमन पॉअींट असंच राहू द्यावं.
— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..