नवीन लेखन...

विज्ञान मराठी : पारिभाषिक शब्द.

शास्त्रीय लेख, शास्त्रीय माहिती किंवा शास्त्रीय बातम्या यांना प्रसिद्धी देअून सामान्य माणसापर्यंत विज्ञान पोचविण्यात, वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांचा फार मोठा वाटा आहे. नाहीतर केवळ विज्ञानीय शोधनिबंधच प्रसिद्ध करणार्‍या नियतकालिकात विज्ञान बंदिस्त राहिले असते. समाज, कळत न कळत, वेगाने विज्ञानाभिमुख होतो आहे. विज्ञान आता आपल्या दिनचर्येचे अेक महत्त्वाचे

अंग झाले आहे. सकाळी अुठल्यापासून तो रात्री झोपेपर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने विज्ञानाशी आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंध येतच असतो.आपले विचार व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करावाच लागतो. लेखकाची भाषा वाचकाला चटकन विनासायास समजली पाहिजे. लेखकाची भाषा समजून घेण्यासाठी खास प्रयत्न करणारे वाचक फार थोडे असतात. झे शब्द, वाणीप्रकार किंवा म्हणी मागच्या पिढीला माहित आहेत आणि ते शब्द, वाणीप्रकार आणि म्हणी आता कालबाह्य झाल्या आहेत. त्या शब्दांचा किंवा म्हणींचा अर्थ सध्याच्या किंवा पुढच्या पिढ्यांना कसा समजणार? या किंवा अशाच पकारच्या काही बाबी विचारात घेअून विज्ञानलेखकाने आपली लेखन शैली घडविली पाहिजे. म्हणजे पहिला प्रयत्न आपली स्वत:ची लेखनशैली घडविणे आणि कालमानाप्रमाणे आणि माध्यमानुसार तिच्यात योग्य तो बदल करण जमले पाहिजे. भाषा बोलली जात, लिहीली जात &nb sp; आणि वाचली जाते. विज्ञानलेखन करतांना सोपी भाषा वापरायची म्हणजे या तीनही क्रियांचा विचार केला पाहिजे. खरे म्हणजे या तीनही क्रियांत अेकसूत्रता असली म्हणजे लेखन करतांना आणि ते वाचतांना खडबडीतपणा जाणवत नाही. आपले विचार अनेक ठिकाणच्या, अनेक व्यक्तींना कळवावयाचे असल्यास अेकतर पत्रकारितेच्या माध्यमासाठी म्हणजे प्रेससाठी लिहून द्यावे लागतात किंवा आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बोलून दाखवावे लागतात. लखनाचा सर्वात
ोकप्रिय पकार म्हणजे पेन, पेन्सिल किंवा बॉलपेनने कागदावर लिहून हस्तलिखित तयार करण किंवा मराठी फॉन्ट वापरून संगणकावर लेख तयार करणे हा होय. विचार लेखनासाठी, भाषा, लिपी अक्षरे, जोडाक्षरे, शब्दसंधी, शुध्दलेखन, व्याकरण आणि शेवटी हस्ताक्षर वगरे बाबींची, मराठीतून विज्ञान लेखन करतांना, अवधाने ठेवावी लागतात.

आपल्या लिखाणातील कित्येक शब्द, संस्कृत प्राकृत आणि बोली भाषेत लिहीता येतात. अुदा. पतीपत्नी, नवराबायको आणि ग्रामीण भागात कारभारी-कारभारीण वगैरे. संस्कृत आधारित शब्द वापरले तर लेख बोजड होतो पण तो अुच्चशिक्षित आणि विद्याविभूषित समाजाला आवडतो. पांढरपेशा वाचकांसाठी साधे मराठी शब्द तर ग्रामीण जनतेसाठी बोली भाषेतील शब्द वापरण्याचे कसब शिकले पाहिजे. विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉंईंट’ ह्या अंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्या सारखे आहे. पण ‘बुदबुदंाक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. टेबलाला मेज्, पंपाला अुदंच्, फोनला दूरभाष किंवा दूरध्वनी, मोबाअीलला भ्रमणध्वनी किंवा भ्रमणसंवादी, झीरॉक्सला प्रकाशप्रत, फॅक्सला दूरप्रत, हे शब्द, शक्यतोवर टाळावेत, आग्रहाने वापरू नयेत. कारण टेबल, पंप, फोन, मोबाआील हे शब्द आता मराठीत रूळले आहेत. शास्त्रीय चिन्हे, घातांक, ग्रीक अक्षरे, समीकरणे, सूत्रे वगैरे छापतांना बर्‍याच अडचणी येतात. आता संगणकाच्या सहाय्याने छपाआी होत असल्यामुळे बर्‍याच अडचणी दूर झाल्या आहेत. 1957 सालच्या ऑक्टोबर महिन्याच ्या 4 ताारखेस राशियाने, पृथ्वीभोवती फिरणारा ‘स्फुटनिक’ हा अुपग्रह पाठविला, तेव्हापासून अंतराळयुगास किंवा अवकाशयुगास प्रारंभ झाला किंवा सुरूवात झाली. त्यानिमित्ताने आणि आजतागायत या क्षेत्रातील वृत्तवर्णने देतांना अनेक नवीन अंग्रजी शब्द प्रचारात आले आणि अजूनही येताहेत. त्यासाठी मराठी प्रतिशब्दही प्रचारात आले. आताच ‘प्रारंभ’ आणि ‘सुरूवात’ हे समानार्थी शब्द वापरले आहेत. विज्ञान मराठीत कोणता मराठी शब्द निवडावा ह्याची थ
डी चर्चा करू या. मराठी शब्द अर्थवाही, लिहावाचायला सोपा, शक्यतोवर जोडाक्षरे आणि अुकार, वेलांट्या, कमीतकमी असलेला आणि अुच्चारायला नादमधूर असेल तर तोच शब्द वापरणे चांगले, म्हणून ‘सुरूवात’ हा शब्द चांगला वाटतो. वक्तृत्त्व स्पर्धा आपल्या चंागल्याच परिचयाची आहे. ‘वक्तृत्त्व’ हा शब्द लिहायलाही कठीण आणि अुच्चारायला त्याहूनही कठीण वाटतो. सरळसरळ ‘भाषण स्पर्धा’ का म्हणू नये? ‘निवृत्तीवेतन’ म्हणण्यापेक्षा ‘पेन्शन’ हा सुटसुटीत शब्द काय वाआीट आहे ? हाच निकष विज्ञानीय किंवा शास्त्रीय आणि तांत्रिक शब्दांनाही लागू केल्यास विज्ञान मराठी बरीच सोपी होआील.मराठी साहित्यलेखन आणि मराठी विज्ञानलेखन यात बराच फरक आहे. साहित्यात, भाषेच्या माध्यमातून लेखकाच्या भावना शक्यतितक्या जशाच्या तशा वाचकापर्यंत पोचवावयाच्या असतात, तर विज्ञान लेखनात शक्यतितक्या स्पष्टपणे आणि शक्यतितक्या सोप्या भाषेत शास्त्रीय सत्ये प वून द्यावयाची असतात. हे साध्य करीत असतांना व्यवहारातील अुदाहरणे देअून थोडी लालित्यपूर्ण भाषा वापरली तरी चालते.

विज्ञानीय आणि वैज्ञानिक विज्ञान लेखनात अंग्रजी शब्दांसाठी चपखल मराठी शब्द वापरावे लागतात ही अेक समस्याच आहे. आता हेच पहा ना Scientific आणि Scientist या दोन्ही शब्दासांठी मराठीत ‘वैज्ञानिक’ हा अेकच शब्द वापरला जातो. ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ आणि ‘वैज्ञानिकांचा मेळावा’ असा जेव्हा अुल्लेख केला जातो तेव्हा ‘वैज्ञानिक’ ह्या शब्दाचे अर्थ निराळे असतात. अेक विशेषण तर दुसरे नाम. परंतू ‘शास्त्रीय प्रयोग’ आणि ‘शास्त्रज्ञांची चरित्रे’ असा शब्दप्रयोग केला तर अर्थ अगदी स्पष्ट होतो. याच धर्तीवर ‘वैज्ञानीय किंवा विज्ञानीय’ आणि ‘वैज्ञानिक’ असे शब्द वापरले तर अर्थ स्पष्ट होतात. ‘विज्ञानीय लेखन’, ‘विज्ञानीय दृष्टीकोन’ तसेच नोबेल पारितोषिक विजेता वैज्ञानिक, अुत्तम विज्ञानकथा लिहीणारा वैज्ञानिक, असे शब्दप्रयोग रूढ व्हावेत असे वाटते.

हार्दिक आणि ह्रदयिकरविवार 26 ऑक्टोबर 1975 च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये माझा ‘हार्दिक लयसंयोजक’ हा, पेसमेकर या वैद्यकीय अुपकरणासंबंधी लेख प्रसिद्ध झाला. आशयप्रधान परिभाषेचा पाठपुरावा करताना आता असे लक्षात येते की ‘लय संयोजक’ हा शब्द बरोबर होता पण ‘हार्दिक’ हा शब्द तितकासा चपखल

नाही. Hearty या शब्दासाठी मराठीत हार्दिक हा शब्द आपण वापरतो. शुभप्रसंगी अुत्सव व्यक्तीचे आपण हार्दिक अभिनंदन करतो. म्हणजे, हार्दिक या शब्दाला, मनापासूनचे, हृदयापासूनचे असा भावनिक अर्थ आहे. मी लेख लिहिला होता ‘कार्डियाक पेसमेकर’ या वैद्यकीय अुपकरणासंबंधी. Cardiac शब्दाचा संबंध हृदय या अवयवाशी आहे. त्यांत भावनांचा संबंध येत नाही. म्हणूनच कार्डियाक या इंग्रजी शब्दास आशयप्रधान परिभाषेत ‘हृदयिक’ हा शब्द जास्त चपखल वाटतो.

बोन्साय आणि नरिमन पॉईंटमोठ्या वृक्षाचे लहान प्रतिरूप करणाऱ्या जपानी बोन्साय पद्धतीस ‘वामनीकरण पद्धती’ हा शब्द वापरावा आणि त्या वृक्षाला ‘वामनवृक्ष’ असे म्हणावे. ‘नरिमन पॉआींट’ याचे भाषंातर ‘नरिमन बिंदू’ असे न करता ‘नरिमन भूशिर’ असे करावे किंवा नरिमन पॉआींट असेच राहू द्यावे.

पिन ड्रॉप सायलेन्स आणि नेकटायसुआी पटक सन्नाटा हे ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ ह्या शब्दसमुहाचे हिन्दी भाषांतर आहे. मराठीत असा प्रयत्न करू नये असे वाटते. परीक्षेच्या हॉलमध्ये अशीच शंातता असते. म्हणूनच आशयप्रधान परिभाषेचे अुद्दिष्ट समोर ठेवून पिन ड्राॅप सायलेन्स या शब्दसमुहासाठी ‘परीक्षाकक्ष शंातता’ असा शब्दप्रयोग करावा. डॉ. रघुवीर यांनी नेकटाय या शब्दासाठी ‘कंठ लंगोट’ हा शब्द सुचविला होता. अर्थाअर्थी हा शब्द बरोबर असला तरी तो विनोदीच वाटतो. त्याअैवजी ‘ग्रीवा बंध’ हा शब्द जास्त चपखल वाटतो. कंठ किंवा गळा हे शब्द, आवाज निर्माण करणाऱ्या आणि मानेच्या आतील अवयवंाशी संबंधीत आहेत. खरे म्हणजे नेकटाय हाच शब्द आता रूढ झाला आहे. शंकरदेवाला नीलकंठ असे नाव आहे. कारण विष प्यायल्यानंतर मानेच्या आतील भागातील अवयव निळे झाले आणि त्यांचे निळेपण मानेवरही दिसले.

संगणकीय मराठीआता संगणकावर मराठी मजकूर टाइप करणे सोपे झाले आहे. मराठीत अलेक्ट्राॅनिक दळणवळणही सोयिस्कररित्या करता येते. संगणकशास्त्राचा विकास आणि त्याचा वापर, प्रामुख्याने अंग्रजीतच होत असल्यामुळे त्यासाठी इंग्रजी संज्ञाच वापराव्या लागतात. अनेक मराठी वृत्तपत्रात, संगणकावरील सदरात, मराठीतून फार अुपयोगी माहिती प्रसिध्द होत असते. परंतू परिभाषेची अडचण प्रकर्षाने जाणवते. अेका मराठी वृत्तपत्रात आलेला, संगणकावरील मजकूर वाचला. त्यात बर्‍याच इंग्रजी संज्ञा मराठीत लिहील्या होत्या. मराठी संज्ञा (ओढूनताणून घडविलेल्या) वापरून तोच मजकूर पुन्हा लिहीण्याचा प्रयत्न केला पण जमला नाही. कुणाला जमेल, आणि वाचणार्‍याला तो मजकूर समजेल असेही वाटत नाही. तो मजकूर पुढे देत आहे..

तुम्ही तुमचं ‘वेब पेज’ बनवलं असलं तर ते अॅक्टिवेट झालं की नाही ते अेकदा तपासून पाहा. तुम्ही सर्फिंगला बसल्यावर अेखादं सॉफ्टवेअर डाअूनलोड करून आपल्या वेबपेजवर अपलोड कसं करायचं, याबद्दल आज काही सांगणार आहे.

‘शेअरवेअर सॉफ्टवेअर’ वा अेखाद्या साआीटवरील काही माहिती तुम्ही तुमच्या हार्डडिस्कवर डाअूनलोड करून घेतलीत की तुमचं वेबपेज ज्या साआीटवर असेल तेथे जायचं आणि अुघडायचं. आणि मग ‘माय अकाअूंट’ ला क्लिक करायचं. तुमच्या अकाअूंटची चालू स्थिती तिथे तुम्हाला समजेल. त्या स्क्रीनला डाव्या बाजूला दोन ऑप्शन असतात. अेक म्हणजे ‘न्यू फोल्डर’ आणि दुसरा ‘वेब प्रोव्हायडेड फोल्डर’. या दोघांतील सोपा ऑप्शन म्हणजे वेब प्रोव्हायडेड फोल्डर. तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला रेडिमेड फोल्डर मिळेल.

अेवढं झालं की मग ‘गो टू माय पेज’ या ऑप्शनला क्लिक करायचं. मग तुम्ही तुमच्या वेबपेजवर जा. पेजच्या सुरुवातीलाच दोन ऑप्शन असतात. अेक असतो ‘ब्राअुस’ आणि दुसरा ‘अपलोड’. त्यापैकी प्रथम ब्राअूसला क्लिक करा, त्यानंतर क्लिक केल्यावर तुमच्या ‘रूट फाआील’ ची म्हणजे माय डॉक्युमेंटस्ची विंडो तुमच्या स्क्रीनमध्ये येआील. तुम्ही जे सॉफ्टवेअर डाअूनलोड केलेलं आहे त्याची फाआील ओपन करायची. मग तुमच्या फाआील्स ब्राअूस बॉक्समध्ये दिसतील. त्यानंतर अपलोड या ऑप्शनला क्लिक करायचं. दोन सेकंदातच तुमच्या फाआील्स तुमच्या वेबपेजवर लोड होतील.

आपल्या वेबपेजवर आपल्याला हवी असणारी माहिती लोड करण्याचा हा अतिशय सोपा मार्ग आहे. तसंच ही माहिती तुम्ही कुणालाही ‘आी-मेल’ करून पाठवू शकता. तुम्ही तुमचं वेबपेज ‘ट्रायपॉड’ वा ‘जीऑसिटी’ वर बनवून घ्या. कारण त्याचे फायदे अनेक आहेत. ‘ऑनलाआीन साआीट’ वर आपली डॉक्युमेंटस् लोड केल्यामुळे आपल्या हार्डडिस्कवरची जागा वाचते. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या वेबपेजवर लोड केलेली माहिती जगातल्या कुठल्याही कॉम्युटर वरून हाताळू शकता, ‘जस्ट लाआीक आी-मेल’.

गजानन वामनाचार्य,180/4931, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई 400 075022-25022897, 9819341841,मंगळवार 8 फेब्रुवारी 2011.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..