विद्या सिन्हा यांचे वडील राणा प्रताप सिंह हे फिल्म निर्माता होते. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४७ रोजी मुंबई येथे झाला. विद्या सिन्हा यांना वयाच्या १८ व्या वर्षी मिस मुंबईचा किताब मिळाला होता. विद्यासिन्हा यांचे १९७४ साली आलेल्या रजनीगंधा व नंतर छोटीसी बात या दोन चित्रपट गाजले होते. विद्या सिन्हा २०११ मध्ये सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात काम केले होते. विद्या सिन्हा यांनी बिजली या मराठी चित्रपटात काम केले आहे. विद्या सिन्हा यांनी बहू राणी , हम दो हैं ना , भाभी आणि कवंजल सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले. विद्या सिन्हा यांनी २००१ मध्ये ऑस्ट्रेलियातील डॉक्टर भीमराव साळुंके यांच्या बरोबर लग्न केले. रजनीगंधा’ मधील ‘रजनीगंधा फुल तुम्हारे, मेहेके मेरे जिवन मे’ हे गाणं जितकं मनभावन तितकच विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकुर यांवर चित्रीत टॅक्सीतील हे गीत ‘कईबार यू ही देखां है, येजो मन की सीमा रेखा है, मन तोडने लगता है, अनजानी प्यास के पीछे, अनजानी प्यास के पीछे, मन दौडने लगता है’अजुन सुध्दा आपले आवडीची गाणी आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
रजनीगंधा चित्रपट
रजनीगंधा चित्रपटाची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=CPwbi-hfenI
Leave a Reply