रविवार १८ डिसेम्बर २०११.
१. अस्तित्व युग : मानवाव्यतिरिक्त इतर सजीव म्हणजे पशुपक्षी, जलचर कीटक वगैरे अजूनही अस्तित्व युगातच वावरत आहेत. या पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकविणे आणि आपल्या प्रजातीची वाढ करणे हाच त्यांचा जगण्याचा उद्देश आहे. आपली प्रजा कशी वाढवावी याचे ज्ञान त्यांच्यातील नर आणि माद्यांना आहे. निसर्गाची तशी योजनाच आहे. त्यांच्या जगण्यात पुरेपूर अतिप्रगत विज्ञान सामावलेले आहे. परंतू त्याची त्यांना जाणीव होणेच शक्य नाही.
मानवही याच युगात बराच काळ वावरत होता. गुहात रहात होता, निसर्गात जे अन्न मिळेल ते खात होता आणि आपली प्रजाती वाढवीत होता. त्याच्या प्रत्येक पेशीत आनुवंशिक तत्व होते. स्त्रिया आणि पुरुषांना हे आनुवंशिक तत्व पुढच्या पिढ्यात कसे संक्रमित करावे याचे उपजत ज्ञान होते. परंतू त्याचा मेंदू त्यच्या नकळत उत्क्रांत होत होता.
२. अध्यात्म युग : मानव जेव्हा शेती करू लागला, पशुधन बाळगून दूधदुभते मिळवू लागला तेव्हा वर्षभरातील दोन वेळचे जेवण मिळेल याची खात्री झाली, सुरक्षित असा निवारा मिळाला तेव्हा अवतीभोवतीच्या निसर्गाचे निरीक्षण करून, त्यावर मनन करून, निरीक्षणांचे त्याच्या कुवतीनुसार स्पष्टीकरण देऊ लागला. सर्वप्रथम त्याच्या लक्षात आले की निसर्गातील घटकात प्रचंड शक्ती आहे, तसेच कमालीची सुसूत्रता आहे. या घटकांचे कुणीतरी दिव्य व्यक्ती आहे तोच ईश्वर आणि हीच अध्यात्म युगाची सुरुवात.
अधात्मा बरोबरच तो आपले जीवनमानही उंचाऊ लागला. त्यासाठी, नकळत का होईना तो विज्ञानाचा विकास करू लागला.
३. विज्ञान युग :: आता अध्यात्म युग संपून आपण विज्ञान युगात वावरत आहोत. निसर्गातील कित्येक गुपिते आपणास समजू लागली आहेत. त्रिकालाबाधीत, अनेक वेळा पडताळून पाहता येतील अशी सत्ये आपल्याला उलगडली आहेत. अध्यात्मयुगातील अमूर्त संकल्पना आता मूर्त स्वरूपात आकलीत होताहेत. पृथ्वीवरील साधन संपत्तीचे ज्ञान होते आहे.
विज्ञानयुगाचा सर्वात मोठा धोका पुढेच आहे. मानव, निसर्गाच्या कार्यप्रणालीत जी ढवळा ढवळ करीत आहे त्याचे दुष्परीणाम त्याला भविष्यात भोगावे लागतील यात शंका नाही.
जी. वामन,
मुंबई.
Leave a Reply