साडे तीन अब्ज पृथ्वीवर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीवाचे आगमन झाले. त्यात उत्क्रांती हो होत, ७० लाख वर्षांपूर्वी कपि पासून मानव उत्क्रांत झाला. साडे तीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या जीवात आनुवंशिक तत्व होते आणि तेच तत्व एका पिढीच्या जिवंत शरीरातून पुढच्या पिढीच्या जिवंत शरीरात संक्रमित झाले. हेच आनुवंशिक तत्व उत्क्रांत झाल्यामुळे नवीन प्रजाती निर्माण झाली. तरीपण पृथ्वीवर जुनी प्रजाती कुठेतरी अस्तित्वात राहिली आणि दोन्ही प्रजातींची संख्या वाढतच राहिली. त्या काळी अस्तित्वात असलेल्या आनुवंशिक तत्वाचा थोडातरी अंश माझ्यात आहे आणि तो मी, माझ्या अपत्यांच्या स्वरूपात पुढच्या पिढीत संक्रमित केला आहे.
साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी हे आनिवंशिक तत्व कुठून आणि कसे आले याचे उत्तर विज्ञानाला अजून तरी सापडले नाही.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply