कॉफी चा स्वर्ग ……
तसे पहिले तर व्हिएतनाम भरपूर मोठे राष्ट्र आहे त्यामुळे छोट्या सुट्टी मध्ये तुम्हाला पूर्ण व्हिएतनाम बघणे नक्कीच शक्य नाही, तर मागे आपण व्हिएतनाम ची मुंबई पहिली तर आज बघुयात दिलवाले का शहर दिल्ली म्हणजेच व्हिएतनामचे राजधानी हनोई ची, जर तुम्ही पर्यटक असाल तर हनोई तुमच्या लिस्ट मध्ये सगळ्यात वर असायला हवे.
आपल्या परंपरेची ओळख जपणारे आणि त्यात आधुनिकतेचा मेळ घालणारे हे शहर, १८७३ मध्ये फ्रान्स नंतर १९४० च्या दशकात जपानचे अधिपत्य आणि मग पुन्हा फ्रान्स असे करत करत १९४५ मध्ये स्वतंत्र उत्तर व्हिएतनाम ची राजधानी आणि त्यानंतर १९७६ मध्ये जेव्हा कंमुनिस्ट पार्टी ने सैगोन वर आपली सत्ता स्थापन केली तेंव्हा हनोई संपूर्ण व्हिएतनाम ची राजधानी बनले. इथे म्हणून तुम्हाला फ्रेंच कॉलनी त्याच बरोबर चिनी , जपानी ह्यांचा प्रभाव मिळतो. ह्या प्रभावामुळे एक पर्यटक म्हणून तुम्हाला इथे भरपूर सन्मान मिळतो.
हनोई हि फक्त देशाची राजधानी नसून ती पर्यटक राजधानी सुद्धा आहे, इथे तुम्हाला अनेक प्रकारचे खानपान पासून तर फिरण्याची ठिकाणे सगळे अनुभावाला मिळते. पण जर तुम्ही इथे आलात नाही कॉफी पिली नाही तर नक्कीच तुमची ट्रिप अपूर्ण … इथे तुम्हला अनेक प्रकारच्या कॉफी चा अनुभव घेता येईल जर तुम्ही उन्हाळ्यात येत असाल तर इथे कोल्ड कॉफी मिळेल आणि थंडी मध्ये गरम , पण एक मिळणार भन्नाट प्रकार म्हणजे एग कॉफी …. काय झाले.. अचानक शॉक खरंच इथे अंडे घातलेली कॉफी मिळते , पण ह्याचा अर्थ तिची चव बिघडते असे नाही पण एक वेगळी जिभेवर रेंगाळणारी चव अनुभवायला मिळते, तुम्हाला जर बंधने नसतील तर हा प्रकार एक मस्ट ट्राय … नॉर्मल कॉफी जर घरी नेणार असाल तर ब्लु माउंटन आणि रेडी मेड कॉफी मध्ये ३ इन १ नक्की घ्यावी.
हनोई तसे हो ची मिन्ह पेक्षा लहान असून तुम्हाला साधारण एकदिवसात पूर्ण हनोई बघता येऊ शकते त्यासाठी तुम्ही हनोई सिटी टूर ची बस घेऊ शकता , लंडन मध्ये असण्याऱ्या डबल डेकर पण वरचा भाग मोकळी असणारी बस इथे दिवसभर चालू असते, तिचे भाडे साधारण ७०० रुपयांपासून सुरु होते.
तुम्ही हनोई मध्ये राहणार असाल तर आणि तिथला रंगीत पर्यटनाचा अनुभव घेणार असाल तर होअन किएम (ओल्ड क्वाटर्स ) मध्येच हॉटेल घ्या आपल्या बजेट नुसार तुम्हाला इथे भरपूर पर्याय मिळतील, जवळपास ५० छोट्या छोट्या गल्ल्याने नटलेला हा परिसर एक वेगळा अनुभव देतो खास करून तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी इथे असलेल्या लावला नक्कीच भेट द्या, सिटी टूर च्या बसेस तुम्हाला इथून मिळतील. इथे प्रत्येक स्ट्रीट वर तुम्हाला एक प्रकारच्या वस्तू अशाने विभागलेले दिसून येईल. इथे चालत फिरले तर तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी बघता येतील पण फिरताना आपले हॉटेल कुठे आहे हे मात्र नक्कीच लक्ष्यात ठेवावे. शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी ७ ते रात्री १०.३० पर्यंत लागण्याऱ्या नाईट मार्केट मध्ये नक्कीच जावे, तुम्हाला इथे इथल्या अनेक भेटवस्तु अतिशय स्वस्तात मिळू शकतात आणि इथे सुद्धा तुम्ही मोलभाव करू शकता.
होअन किएम च्या जवळच साधारण ३ किमी अंतरावर टाय हो (वेस्ट लेक) नावाची जागा आहे तिथला सूर्यास्त तर एकदम अवार्णिनीय , संध्याकाळी निळया आकाशात गुलाबी जांभळा रंगाची छटा जणूकाही एखाद्या कॅन्वाह्स वर एखादा चित्रकाराने काढलेले चित्र वाटते. संध्याकाळी मस्त वेस्ट लेक च्या काठी एखाद्या कॉफी शॉप मध्ये बसून सूर्यास्तचा अनुभव हा नक्कीच घेण्यासारखा आहे.
हनोई मध्ये वन फुक नावाचे एक छोटे खेडे आहे , आधी ते खेडे होते पण आता ते शहराच्या भर वस्तीमध्ये असून जर तुम्हाला सिल्क घ्याचे असेल तर हनोई मध्ये इतरत्र ना घेता इथूनच घ्यावे, हनोई मध्ये तसे फिरण्यासाठी पपेट थिएटर , हो ची मिन्ह मेलोसुईम, डाँग शून मार्केट, ह्याच बराबर जर तुम्हाला एखादा चांगला औभाव हवा असेल तर इथे टाइम्स सिटी कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या मत्स्यालयाला नक्कीच भेट द्या इथे असणारे शो बघ्यासारखे असतात, लहानमुलांसाठी तर नक्कीच.
हॅनाइ आणि हो ची मिन्ह च्या खाण्यात फारसा फरक तुम्हाला जाणवणार नाही पण इथे थंडी, पाऊस , उन्हाळा हे सगळे ऋतू असल्यामुळे आपल्या थंड पासून गरम पदार्थांची चव अनुभवायला मिळते, आणि जर तुम्ही शाकाहारी असाल तर हनोई मध्ये अन चाय म्हणून अनेक शाकाहारी हॉटेल मिळतील, आणि नक्कीच तुम्हाला व्हिएतनामीस शाकाहारी आवडेल.
हनोई ला भेट द्यायची असेल तर सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि फेंब्रुवरी ते एप्रिल हा काळ उत्तम. डिसेंबर जानेवारीत इथे थन्डी असते त्यामुळे जर तेंव्हा येत असाल तर गरम कपडे सिबत ठेवावेत. हनोई पासून जवळच हालॉंग बे , सपा, निन्ह बिन्ह , बा वि उद्यान हे असे अनेक ठिकाणे असून त्याबद्दल आपण पाहुयात पुढच्यावेळात ……
— यशोदीप भिरूड
Leave a Reply