जुन्या काळातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म १२ मे १९०७ रोजी झाला. विजय भट्ट यांची प्रकाश पिक्चर्स व एव्हरग्रीन पिक्चर्स नावाची सिनेवितरण कंपनी होती. विजय भट यांचे रामराज्य (१९४३), बैजू बावरा (१९५२), गूंज उठी शहनाई (१९५९), हिमालय की गोद में (१९६५) हे चित्रपट खूप गाजले. गिरगाव, ग्रॅण्ट रोड येथील सुपर टॉकीज मध्ये १९४३ मध्ये विजय भट्ट यांच्या एव्हरग्रीन पिक्चर्स या कंपनीने सुपर थिएटर चालविण्यास घेतले आणि हे थिएटर नावलौकिकास आणले.
विजय भट्ट यांच्या प्रकाश पिक्चर्सचा ‘रामराज्य’ इथे सलग १०२ आठवडे चालला. हा हिंदी व मराठी या दोन्ही भाषांत काढला होता. रोज मराठीत एक आणि हिंदीत असे दोन खेळ इथे होत असत. विजय भट्ट यांनी महात्मा गांधीं यांना ‘रामराज्य’ दाखवायला सुपरला घेऊन आले होते, पण राम रामासारखा दिसत नाही आणि सीता ही सीतेसारखी वाटत नाही म्हणत एक-दोन रिळे पाहून गांधीजी निघून गेले. महात्मा गांधींनी आयुष्यात पाहिलेला हा एकमेव चित्रपट म्हणून ‘रामराज्य’ची खूप पब्लिसिटी झाली.
सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या धोबिणीची भूमिका पाश्र्वगायिका अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकीने केली होती. विजय भट्ट हे ’फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. विजय भट यांचे निधन १७ आक्टोबर १९९३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply