नवीन लेखन...

विजय’स्तंभ

या अभिनेत्याला ज्या फिल्म निर्मात्यांनी नाकारले होते, तोच अभिनेता आज एकोणऐंशीव्या वर्षीही कोट्यावधी सिनेरसिकांचा ‘आयडॉल’ आहे!!

१९४२ साली जन्मलेल्या या अमिताभने ‘सात हिंदुस्थानी’ चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्याला ‘आनंद’ चित्रपट मिळाला. राजेश खन्नावर उपचार करणाऱ्या डॉ. भास्कर बॅनर्जीची त्यानं साकारलेली व्यक्तीरेखा रसिकांना भावली. तो मिळणाऱ्या छोट्या मोठ्या भूमिका करीत होता.‌ ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटा दरम्यान संघर्षाच्या काळात सात वर्षे तो हास्य अभिनेता मेहमूदच्या सोबत रहात होता.

१९७३ साल उजाडलं आणि ‘जंजीर’ चित्रपटाद्वारे अ‍ॅंग्री यंगमॅन म्हणून त्याचं ‘बारसं’ झालं! या चित्रपटाने त्याला जीवनसाथी, ‘जया’ मिळाली. ‘अभिमान’ व ‘नमक हराम’ मधून त्याच्या अभिनयाचा कस लागला. ‘शोले’ चित्रपटाने इतिहास निर्माण केला. अब्जावधीची कमाई करणारा हा एकमेव चित्रपट ठरला.

पुढील वीस वर्षे त्याने सुपरस्टार हे विशेषण, अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपट करुन सार्थ ठरविले. त्यातील ‘दिवार’, ‘सिलसिला’, ‘त्रिशूल’, ‘अमर अकबर अॅन्थोनी’, ‘शराबी’ असे त्याचे अनेक चित्रपट ‘माईलस्टोन’ ठरले..

या झंझावाती कारकिर्दीत ‘कुली’ चित्रपटात फायटींगच्या चित्रीकरण प्रसंगी त्याला अपघात होऊन ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये तो काही महिने मृत्यूशी झुंज देत होता.. कोट्यावधी भारतीय रसिकांच्या प्रार्थनेमुळे तो त्या संकटातून बाहेर आला.

सर्व सामान्य माणसाप्रमाणे त्याच्याही जीवनात चढ-उतार, मान-अपमान, कौतुक-तिरस्कार, श्रीमंती-दिवाळखोरीचे प्रसंग आले.. तरीही तो डगमगला नाही..

त्याने ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटाची निर्मिती केली, त्यात अपयशी ठरला. ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडला. नंतर अनेक चित्रपटांतून चरित्र भूमिका साकारल्या. ‘बागबान’ हिट झाला व पुन्हा तो चित्रपट व जाहिरातींमध्ये व्यस्त झाला..

अभिषेकला तरुण असून काम मिळाले नाही, त्या उलट वयस्कर अमिताभ रात्रंदिवस काम करीत राहिला.. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अमिताभला पहातो, वाचतो व ऐकतो.. तो सोने घेण्यासाठी बोलतो व सोने तारण ठेवून कर्ज काढायचीही गळ घालतो.. मिठाईची जाहिरात करतो व अति खाल्ल्यावर ते हजम करणाऱ्या औषधाचीही जाहिरात करतो…

त्याला चित्रपटातून ‘विजय’ हे नाव फारच लकी ठरले. ते नाव असलेले त्यांचे सर्व चित्रपट रौप्यमहोत्सवी झाले. आज इतक्या वर्षांनंतरही दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणाऱ्या, या चितोड सारख्या ऐतिहासिक ‘विजय’स्तंभची उंची दुसरा कोणीही कलाकार गाठू शकलेला नाहीये..

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

११-१०-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..