नवीन लेखन...

पुण्यातील संग्राहक विक्रम पेंडसे

पुण्यातील संग्राहक विक्रम पेंडसे यांचा जन्म ६ जून १९६६ रोजी झाला.

विक्रम पेंडसे यांना लहानपणापासूनच सायकल व मोटरसायकलीचे अप्रूप होते. वाणिज्य शाखेकडील पदवीधर असलेले विक्रम पेंडसे १९९० पासून दुरुस्तीच्या व्यवसायात होते. काही वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धात वापरली गेलेली BSA Paratrooper ही सायकल हाती आल्यानंतर सुरु झालेली ही वाटचाल आज एका संग्रहालयात परिवर्तित झालेली आहे. जीर्ण अवस्थेत असणाऱ्या अनेक सायकली मूळ रुपात परत आणण्यासाठी विक्रम यांना साथ मिळाली ती पांडुरंग गायकवाड यांची. गायकवाड हे सुद्धा सायकलप्रेमी आणि सायकलपटू. गायकवाडांनी दक्षिण आशियाई सायकलींग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गायकवाडांच्या अथक प्रयत्नातून या संग्रहातील प्रत्येक सायकल आजही चालत्या अवस्थेत आहे. सायकली जमवता जमवता विक्रम यांच्या संग्रहात लहान मुलांच्या तीन चाकी सायकल, सायकलींचे विविध सुट्टे भाग, पेडल कार्स, कुलूपे,घड्याळे,रेडिओ, ग्रामोफोन,रेकॉर्ड प्लेअर, टाईप रायटर,टेलिफोन, विविध आकारांच्या आणि रंगाच्या काचेच्या बाटल्या, अडकित्ते आणि पानाचे डबे जुनी वजने व मापे आणि अनेक घरगुती वस्तू यांचादेखील समावेश झाला आहे. हा संग्रह सर्वांसाठी खुला असावा या हेतूने पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये विक्रम पेंडसे यांनी सायकलींचं एक आगळं संग्रहालय सुरू केलं आहे.

या संग्रहालयाच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांनी एका जुन्या सायकलच्या दुकानाची प्रतिकृती उभारली आहे. सायकल विषयीचा सेट अप त्यात पाहायला मिळतो अनेक ठिकाण हून जमविले सायकलसंग्रह पाहून थक्क व्हायला होते. येथील जुन्या पुण्याची छायाचित्रेही आपल्याला आकर्षित करतात. असे हे छंदातून उभे राहिलेले हे संग्रहालय आपल्याला सायकलच्या रम्य आठवणींची सफर घडवते.

विक्रम पेंडसे यांची Web site.

संग्रहालयाची वेळ -११ ते ७ (पूर्वनियोजित वेळेनुसार) मंगळवारी बंद (शासकीय सुट्यांच्या दिवशी चालु)

पत्ता-२२.हर्ष सहवास सोसायटी, कर्वेनगर, पुणे ५२

फोन नंबर. ८५३०४१८५९७ तिकीट-आहे.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..