लीन दीन ती होऊन पुढती,
झुकली होती त्यावेळी ।
हात पुढे आणि नजर खालती,
ज्यांत दिसे करूणा सगळी ।।१।।
लाचार बनूनी पोटासाठी,
हिंडे वणवण उन्हांत सारी ।
वादळ वारा आणिक पाऊस,
संगत घेवून फिरे बिचारी ।।२।।
मदतीचा हात दिसे,
जागृत होता भूतदया ।
जनसामान्यात असती
मानवतेतील ही माया ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply