मराठीतील बालवाङ्मफयाचे जनक विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८४० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवी या गावी झाला.
इंग्रजी तीन इयत्तांपर्यंतच त्यांचे शिक्षण झालेले असले, तरी इंग्रजी व मराठी भाषांवर त्यांनी चांगले प्रभुत्व मिळविले होते.
शिक्षणक्षेत्रात प्रथम एक शिक्षक या नात्याने शिरून पुढे ते एक शिक्षणाधिकारी झाले,
१८८१ साली मुलांसाठी बालबोध या नावाचे एक मासिक काढून त्यातून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. विविध प्रकारचे लेखन वैपुल्याने केले व मराठी बालवाङ्मलयाचा पाया घातला.
त्यांची सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कविता, इतिहास, चरित्रे, बोधपर साहित्य इत्यादींचा त्यांत समावेश होतो. सहज व सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
विनायक कोंडदेव ओक यांचे निधन ९ ऑक्टोबर १९१४ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply