विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला.
विनायक सदाशिव वाळिंबे उर्फ वि. स. वाळिंबे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहेत ते विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक आणि मुख्य म्हणजे म्हणजे ‘पुलं’च्या शब्दांत सांगायचं झालं तर अत्यंत ‘वाचनीय लेखक’ म्हणून! या दोनच शब्दांत ‘पुलं’नी त्यांच्या सर्व लेखनाचं सार सांगितलंय. उमेदवारीचा काळ ‘अग्रणी’ दैनिकात, ‘रोहिणी’ मासिकात, नंतर ‘प्रभात’ आणि ‘ज्ञानप्रकाश’ वृत्तपत्रात काढल्यानंतर, वाळिंबे यांनी आपल्या पत्रकारितेचा महत्त्वाचा सर्व काळ पुण्यात ‘केसरी’ वृत्तपत्रात काढला. त्यांच्या सुहृदांनी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘उमदा लेखक, उमदा माणूस’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचं संपादन डॉ. अरुणा ढेरे यांनी केलं आहे.
गरुडझेप, हिटलर, इंदिरा गांधी बंगलोर ते रायबरेली, इस्रायलचा वज्रप्रहार, नेताजी, ऑपरेशन थंडर, पराजित-अपराजित, सत्तावन्न ते सत्तेचाळीस, सावरकर, श्री शिवराय, स्टॅलिनची मुलगी, व्होल्गा जेव्हा लाल होते, १९४७, वॉर्सा ते हिरोशिमा, स्वातंत्र्यवीर अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहेत. वि. स. वाळिंबे यांचे २२ फेब्रुवारी २००० रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply