खोड्या करणे, त्रास देणे,
हाच बनला स्वभाव त्याचा
वाटत होते बघून त्याला,
दूरोपयोग करि तो शक्तीचा…१
पाय ओढणे, खाली पाडणे,
कपड्यावरी तो चिखल फेकणे
मारपिट ती करूनी केंव्हां,
गुंडपणा तो करित राहणे…२,
बेफिकीर ती वृत्ती तयाची,
स्वार्थाने तो भरला पुरता
तुच्छ लेखी इतर जनाना,
स्व आनंद साधत असतां….३,
‘आनंद’ मिळवणे हेच ध्येय,
जीवनाचे तत्त्व खरे ते
विपरीत मार्ग अवलोकितां,
समाधान राही दूर तेथें…४
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply