नवीन लेखन...

विरोधी आहार म्हणजे काय?

आयुर्वेदानुसार, विरोधी आहार (कॉन्ट्रास्ट डाएट) म्हणजे अशा अन्नपदार्थांचे मिश्रण, जे एकत्र खाल्ले तर शरीरावर विपरीत परिणाम होतो. असे पदार्थ आपल्या आहारात दीर्घकाळ समाविष्ट केल्याने अंधत्व, वेडेपणा, नशा, अशक्तपणा, त्वचारोग, नपुंसकता आणि वंध्यत्व यांसारखे आजारही होऊ शकतात. आयुर्वेदाचे प्रख्यात महर्षी आणि आयुर्वेद विशारद चरक यांनीही या मुद्द्याचे समर्थन केले आहे आणि सांगितले आहे की, जर अन्नाच्या विरूद्ध अन्न दीर्घकाळ खाल्ले तर काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो.
आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार म्हणजे काय, विरुद्ध आहार कुठल्या प्रकारचे असतात आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात हे समजून घेऊया.

आयुर्वेदानुसार, प्रत्येक पदार्थामध्ये वेगळी उर्जा, चव असते आणि शरीरावर त्याचा वेगळा प्रभाव पडतो. त्यामुळे काही पदार्थ एकत्र खाण्यापूर्वी तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे. आयुर्वेदिक डॉक्टर दिश्रा भावसार यांनी कोणते पदार्थ एकत्र खाणे टाळले पाहिजेत. निरोगी राहण्यासाठी काही असे पदार्थ आहेत जे चुकूनही एकत्र खाऊ नये कारण त्यामुळे तुमच्या आतड्यावर परिणाम होऊ शकतो आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतो. “तुम्ही जे खाता तेच तुम्ही आहात” असे म्हणतात ते अगदी खरे आहे.

दर वर्षी सात जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिवस (World Food Safety Day) साजरा केला जातो. निरोगी आणि चांगल्या सुदृढ आयुष्यासाठी सुदृढ आहार अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे आपण अनेकदा चांगल्या गोष्टींचा समावेश आहारात करतो. मात्र असं करताना आपण काही पदार्थ एकत्र खातो. हे असं खाणं तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

आजकाल हॉटेल्समध्ये तर असे प्रकार सर्रास पहावयाला मिळतात, आणि आपण घरात देखील नकळत असे पदार्थ बनवतो. जे आपल्याला माहित नसते. कोणते फळ किंवा कोणत्या भाज्या एकत्रित खाल्ल्याने आपल्याला व आपल्या घरातील व्यक्तींना त्रास होऊ शकतो. आपण या लेखामध्ये अशाच काही विरुद्ध आहारा बद्दल आपण माहिती घेणार आहोत.

विरुद्ध आहाराचे प्रकार

आहार विरुद्धमध्ये संयोग विरुद्ध, काल विरुद्ध, देश विरुद्ध व हृदय विरुद्ध असे विविध प्रकारचे आहार येतात. पण हा आहार जर तुम्ही सेवन केला नाही तर तुम्ही कायमच निरोगी राहाल. आता याची वेगवेगळी उदाहरणे पुढे दिलेली आहेत. यामुळे तुमच्या लक्षात येईल की निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात.

विरुद्ध आहार – गुण विरुद्ध:

दूध आणि मासे एकत्र खाऊ नयेत याचे कारण दूध थंड गुणधर्माचे तर मासे उष्ण गुणधर्माचे असतात. हे नियमित सेवन केल्याने त्वचा विकार, रक्त विकार होऊ शकतात. तसेच हे दोन्हीही अभिष्यंदि म्हणजे मार्गाचे अवरोध करणारे आहेत. दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास अशुद्ध रक्त निर्माण होते आणि त्यामुळे रक्तवाहिन्यामधे अडथळा निर्माण होऊ शकतो. दुधासमवेत फळे खाऊ नयेत, म्हणजेच मिल्कशेक, फ्रूट सॅलेड खाऊ नये. दुधासमवेत कुळीथ, वरी, वाल, मटकी, गूळ, दही, चिंच, जांभूळ आणि आंबट पदार्थ खाऊ नये. खिचडीत दूध घालू नये. दुधासोबत फणस सुध्दा खाऊ नये हा देखील विरुद्ध आहारच आहे. दह्यासह उष्ण पदार्थ, फणस, ताडगोळा, दूध, तेल, केळे, मासे, मांस, चिकन, गूळ खाऊ नये. दूध, ताक किंवा दह्यासह केळे खाऊ नये. दुधासमवेत लसूण, पालेभाज्या किंवा मुळा खाऊ नये. बरेच दिवस खाल्ल्याने त्वचेचे रोग होतात. पालेभाज्या किंवा मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. दूध, ताक किंवा दह्यासह केळे खाऊ नये. अनेकांना अननस आवडते तसेच त्याचा ज्यूस देखील बरेच लोक आवडीने घेतात. तर या अननसाचा ज्यूस जर तुम्ही घरी करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अननसाचा ज्युस करताना त्यामध्ये दुध घालु नये. विरुद्ध आहार यादीत अननस आणि दूध यांचा समावेश होतो.
दुसरे उदाहरण म्हणजे थंड आणि गरम पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. उदाहरणार्थ गरम जेवणानंतर आपण नेहमी आईस्क्रीम खातो, हे विरुद्ध आहे. आणखी एक म्हणजे गरम चहा पिल्यानंतर लोक थंड पाणी पितात त्यामुळे त्वचा विकार होऊ शकतात.
हल्ली मिल्कशेक करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. मग गोड, आंबट अशा सर्वच फळांसोबत मिल्कशेक केले जातात. आंबट फळांसोबत दूध ठेवले तर ते नासते, तसेच मिल्कशेक खाल्ल्याने पोटात त्याचा पचनावर परिणाम होतो.

विरुद्ध आहार – संयोग विरुद्ध

संयोग विरुद्धचे एक उदाहरण म्हणजे दूध, लोणी, तेल, वसा म्हणजे चरबी यासारखे जड पदार्थ इतर जड पदार्थांसोबत म्हणजे चिकन, मटण यासोबत संयोग करणे. यामुळे दोन प्रकारच्या जड पदार्थांचे पाचन करताना पोटाला जास्त काम करावे लागते व त्यामुळेही विकार होऊ शकतात.

मध हा स्वभावतःच शीत गुणाचा आहे. जर गरम केला किंवा गरम पदार्थांसोबत जर घेतला तर त्याचे अपचन होऊ शकते म्हणून मध कधी गरम करून खाऊ नये. हल्ली वजन कमी करण्यासाठी गरम पाणी आणि मध एकत्र करून घेतले जाते तर असे शक्यतो घेऊ नये.
मुळा हा आपल्या शरीरासाठी गुणकारी असला तरी मुळा आणि उडीद डाळीचे वरण एकत्र जेवणात खाऊ नये याने देखील अपाय उद्भवतात.त्यामुळे मुळा आणि उडीद हे विरुद्ध आहार लिस्ट मध्ये येतात.

विरुद्ध आहार – संस्कार विरुद्ध

संस्कार विरुद्धचे आपण एक उदाहरण पाहूयात. ते म्हणजे सारखे, वारंवार गरम केलेले अन्न, फ्रीजमधून काढून गरम केलेले अन्न किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न. या पदार्थांचे जर आपण सतत सेवन केले, तर त्याने पचनाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा त्यातले पोषकतत्व आपल्याला मिळत नाहीत. तसेच तूप आणि मध समप्रमाणात कधीही घेऊ नये, त्यामुळे पचनाचे विकार होऊ शकतात.

विरुद्ध आहार – काल विरुद्ध

काल विरुद्ध म्हणजे थंडीत रुक्ष वातवर्धक आहार घेणे. जसे थंडीमध्ये रुक्ष वातवर्धक गोष्टी घेण्याची सवय लागलेली असते म्हणजे खूप थंडी पडलेली आहे आणि आपण आईस्क्रीम खातो, कोल्ड्रिंक पितो. यामुळे एलर्जी, त्वचा विकार, रक्त विकार निर्माण होतील.
काल विरुद्धचे आणखी एक उदाहरण म्हणजे उन्हाळ्यात उष्ण, तिखट, चमचमीत, तळलेले पदार्थ खाणे, यामुळे अंगाला सूज येणे, वारंवार तोंड येणे, मुळव्याध होणे, अंगाला खाज येणे यासारखे विकार होऊ शकतात.

विरुद्ध आहार – देश विरुद्ध

आजकाल आपण पाहतो की नोकरी किंवा व्यवसाया निमित्त किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. तिथल्या पदार्थांची आपल्या शरीराला सवय नसते तरीदेखील आपण ते पदार्थ खातो. एक उदाहरण पाहूयात – आपण महाराष्ट्रात राहतो पण आपण साउथ इंडियन पदार्थ किंवा नॉर्थ इंडियन पदार्थ आजकाल जास्त खातो, त्यामुळे त्याचा आपल्या पचनावर विपरीत परिणाम होऊन आपल्याला विविध प्रकारच्या व्याधींना तोंड द्यावे लागते.
सवयीने व अल्प सेवनाने म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा जर आपण हे आहार विरुद्ध सेवन केले, तर आपल्याला त्याचा सहसा अपाय होत नाही.

विरुद्ध आहार – संयोग विरुद्ध

हृदय विरुद्ध आहार – जसे आपण जेवतोय आणि टीव्ही बघत बसलोय, जेवणात काय आहार आहे, कोणत्या चवीचा आहार आहे हे कधीच कळत नाही आणि म्हणून हृदय आहार विरुद्ध कधीच नसावा. त्यासाठीच शांतपणे, एकांतात जेवण करावे, तसेच जेवताना बोलू नये.
नियमित व्यायाम करणारे, स्निग्ध आहार घेणारे, ज्यांचा अग्नी तीक्ष्ण आहे, जे तरुण आहेत, बलवान आहेत अशांनी कधीतरी सवयीने व अल्प सेवनाने जर आहार विरुद्ध केला तर ते फारसे बाधक होत नाही.
पण सतत विरुद्ध आहार घेण्याने पचनाचे विकार, अंगाला सूज येणे, त्वचा विकार असे विविध प्रकारचे विकार होऊ शकतात. आहार विरुद्धने उत्पन्न होणाऱ्या रोगांची चिकित्सा वमन, विरेचन तसेच संशमनाने करता येते परंतु विरुद्ध आहार घेतलाच नाही तर कोणतेही विकार उत्पन्न होणार नाहीत.

निसर्गत विरुद्ध – मेंढीचे दूध आणि मोहरीच्या पाल्याची भाजी पचावयास जड असते अन् पचल्यानंतर शरिरात दोष वाढवते.

देशविरुद्ध – दमट वायूमान (हवामान) असलेल्या समुद्राकाठच्या किंवा दलदलीच्या प्रदेशात स्निग्ध किंवा शीत पदार्थ अधिक प्रमाणात खाणे; कोरड्या वायूमानात रुक्ष आणि तिखट पदार्थ खाणे. त्यामुळे शरिरात कफदोष वाढतो.

कालविरुद्ध – वसंतऋतूत किंवा रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने कफदोष वाढतो. हिवाळ्यात थंड पदार्थ आणि उन्हाळ्यात उष्ण (गरम) पदार्थ खाणे.

अग्नीविरुद्ध – शरिरातील अग्नी म्हणजे पचनशक्ती. ती अल्प (कमी) असतांना पचावयास जड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यास अपचन होते.

प्रकृतीविरुद्ध – पित्तप्रकृतीच्या व्यक्तीस तिखट,आंबट किंवा खारट आणि उष्ण (गरम) पदार्थ दिल्याने तिच्या शरिरातील पित्त वाढते.

सात्म्यविरुद्ध (ॲलर्जी) – एखाद्या व्यक्तीस एखाद्या अन्नपदार्थाची ॲलर्जी असल्यास रेच (जुलाब) होणे, पोटात दुखणे, पित्त उठणे इत्यादी लक्षणे होतात.

दोषवृद्धीमुळे विरुद्ध – दूध आणि मासे दोन्ही कफवर्धक असल्याने शरिरात कफ वाढतो.

अन्न शिजवण्याच्या भांड्याच्या गुणाच्या विरुद्ध – तांबे किंवा पितळ यांच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवल्यास निळसर रंग येतो व अन्न विषारी बनते. तसेच अल्युमिनिअमच्या भांड्यात शिजवलेले अन्न प्रदीर्घ काळ खाल्ल्यास अल्झेमेअर (कंप रोग), व इतर वाईट परिणाम होतो.

वीर्यविरुद्ध – शीत आणि उष्ण अन्नपदार्थांचे एकत्र सेवन करणे,

दिनचर्याविरुद्ध – अधिक झोप घेणार्‍या व्यक्तीस कफवर्धक अन्न दिल्याने कफ वाढतो.

क्रमविरुद्ध – शौचास किंवा लघवी लागली असता ते न करता आधी जेवण करणे.

पाकविरुद्ध – कच्चे किंवा जळलेले अन्नपदार्थ खाणे. दोन वेळा तापवलेले किंवा शिजवलेले अन्नपदार्थ थंड झाल्यावर किंवा शिळे झाल्यावर परत उष्ण (गरम) करून खाऊ नयेत.

प्रमाणविरुद्ध – मध, तूप, तेल, प्राण्यांची चरबी समप्रमाणात घेऊ नये. तूप-मध समप्रमाणात घेऊ नये.

मनाविरुद्ध – नावडते अन्नपदार्थ खाणे.

आयुर्वेदात काही पदार्थ एकत्र किंवा लगेच खाण्यास सक्त मनाई केली आहे.

हे हानिकारक (Harmful Food Combinations) मानले जाते. याच्या सेवनामुळे तुम्हाला पचन आणि त्वचेशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.

क. मधासह कमळबीज खाऊ नये.
ख. जलचर प्राण्यांचे मांस, मध, गूळ, दूध, मुळा, भात, मोड आलेले धान्य, उडीद किंवा तीळ यांच्यासह खाऊ नये. बरेच दिवस खाल्ल्यास दृष्टीवर परिणाम होतो. तसेच शरिरास कंप सुटणे, ऐकू न येणे, अस्पष्ट उच्चार होणे, मानसिक अस्वस्थता आणि मृत्यू ही लक्षणे होतात.
ग. पालक तिळाच्या तेलात तळून खाऊ नये. त्यामुळे रेच (जुलाब) होतात.
घ. फणसाचे गरे खाल्ल्यावर विडा खाऊ नये. अत्यंत घातक आहे.

अ. मुळा हा आपल्या शरीरासाठी गुणकारी असला तरी मुळा आणि उडीद डाळीचे वरण एकत्र जेवणात खाऊ नये याने देखील अपाय उद्भवतात.त्यामुळे मुळा आणि उडीद हे विरुद्ध आहार लिस्ट मध्ये येतात.
आ. फणस व खाऊचे पान, काकडी आणि टोमॅटो, कांदा आणी पालक हे पण विरुद्ध आहार यादीत येतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ अन्नं ब्रह्म । : खंड १’ आणि सनातनचा ग्रंथ सात्त्विक आहाराचे महत्त्व’)
परंतु आयुर्वेद (Ayurveda) दुधापासून बनवलेले पदार्थ सर्व प्रकारच्या जेवणासह खाण्याच्या कल्पनेचं अजिबात समर्थन करत नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही मांसाहार करत असाल त्यावेळी ते टाळणं उत्तम. आयुर्वेदात काही पदार्थ एकत्र किंवा लगेच खाण्यास सक्त मनाई केली आहे. चिकन आणि दूध एकत्र का खाऊ नये? डॉक्टर कोहली यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे की चिकनसह (किंवा इतर कोणतेही मांसाहारी अन्न) दूध एकत्र करणे ही योग्य नाही, कारण दुधाची पचन प्रक्रिया चिकनपेक्षा वेगळी आहे. दूध आणि चिकन एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. दुसरीकडे, काही लोकांसाठी चिकन पचायला जड असते, ज्यामुळे पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. आयुर्वेदाचे डॉक्टर सांगतात की, या मिश्रणाच्या सेवनाने शरीरावर दीर्घकाळ विपरीत परिणाम दिसू लागतात. या परिणामांमध्ये पोटाशी संबंधित समस्या जसे की पोटदुखी, मळमळ, अपचन, गॅस, गोळा येणे, अल्सर, दुर्गंधी, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि अनेक गंभीर त्वचा विकार यांचा समावेश होतो.
निरोगी आहार म्हणजे विषारी किंवा हानिकारक पदार्थांपासून दूर राहणे किंवा जीवनशैलीचा चांगला मार्ग सुनिश्चित करण्यासाठी अन्न संयोजन करणं होय.

वाचकांना आता लक्षात आले असेल की विरोधी अन्न कोणकोणते आहेत. त्याची काळजी घेऊन त्यांनी निरोगी रहा.

सर्व वाचकांना जागतिक अन्न सुरक्षा दिवसाच्या शुभेच्छा.

१. बरेच लेख व विविध संदर्भ पुस्तके.
२. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने


 

 

डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 77 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

5 Comments on विरोधी आहार म्हणजे काय?

  1. Very interesting and informative article.
    We r unaware of the many things when it
    Is related to our day today activity of food habits. Nice article
    Describing the care once should while eating our food.
    👌🏻👌🏻👍

  2. विरोधी आहार म्हणजे काय ही संकल्पना समजली. नकळत आपण सर्रास पणे विरोधी आहार घेत आलो आहोत. यात सुधारणा करणे आवश्यक आहे. उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद.

  3. विरोधी आहार म्हणजे काय? डॉ.कुळकर्णी ह्यांचा लेख नुकताच वाचनात आला. बर्याच गोष्टी नकळतपणे आपल्या आहारात आपण समाविष्ट करतो. उदाहरणार्थ, केळ्याचे शिकरण, फणसाचे गरे असे बर्याच गोष्टी आहेत ज्या सर्रास पणे खतो. लेख वाचून, उलगडा झाला की, आपले पोट मधुन अधुन का बिघडते हे लेख वाचून समजते.

    • विरोधी आहार म्हणजे काय ही संकल्पना समजली. नकळत आपण सर्रास पणे विरोधी आहार घेत आलो आहोत. यात सुधारणा करणे आवश्यक आहे. उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..