विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा,
आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा ।।१।।
दृष्य वस्तूंचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं,
आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी ।।२।।
वस्तूंच्या आठवणी, सुख देई आम्हांला,
क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला ।।३।।
उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी,
विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी ।।४।।
एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे,
जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply