उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरजीकर. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १८७२ रोजी झाला. विष्णू दिगंबर पलुसकर हे त्यांचेच शिष्य होते.
विष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल्हेर गायकीवर प्रभूत्व होते. त्यांचा शिष्यवर्गही बराच होता. पं यशवंतबुवा मिराशी, पं विनायकबुवा पटवर्धन ही काही त्यांच्या शिष्यांची नावे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पलुसकरांचे खूपच मोठे योगदान केले आहे. त्यांनी संगीतविषयक अनेक क्रमिक पुस्तके लिहिली. स्वरलिपी तयार केली जी ‘पलुसकर-पद्धती’ म्हणून ओळखली जाते..
“गंधर्व महाविद्यालयाची” १९०१ साली “लाहोर” येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्याचे फळ होय.हिन्दुस्तनि रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली. विष्णु दिगंबर पलुसकर हे निःसीम राम भक्त होते.”गंधर्व महाविद्यालयाची” स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी,थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली.
१९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी “श्री रामनाम आधारश्रम” म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तीतवात आहे. ग्वाल्हेर परंपरेचेच लोकप्रिय गायक पं दत्तात्रेय विष्णू तथा बापूराव पलुसकर हे त्यांचे सुपुत्र होत. पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांचे निधन २१ ऑगस्ट १९३१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
Leave a Reply