मनाची शांतता जगातल्या त्रासदायक गोष्टींनी बिघड़ली की तेवढ्यापुरती तूझी मुर्ती दृष्टिआड़ होते. मग अशावेळी ड़ोळे मिटून फोटोतल्या तूला मनाच्या जगात बिलगावं . पाणी दूधड़ी भरून वाहू द्यावं .या पाण्यातच तर आयुष्य वाहून गेलंय. जसं पाण्याला मागे वळता येत नाही .तसचं आयुष्यालाही नाही. किती छान झालं असतं जर आयुष्याला मागे वळविता आलं असतं तर ….विझलेले आतले निखारे आणी एकाकी पण………पोखरलं नसतं मन ….तूझं ,माझं आणी प्रत्येकाचं च ……हो की नाही ? मला न कधी कधी वसुंधरेचा फार हेवा वाटतो. तिला कसं पुन्हा नव्याने अंकूरण्याचे वरदान आहे. तसे आपल्याला का नाही? जे जे म्हणून हातचे सुटून गेले ते ते पून्हा नव्याने जगता आले असते. एकाच जन्मी पूनर्जन्म ……झाड़ासारखा …..नवी पालवी ,नवी स्वप्ने ,नवी नाती ……..पण तू मात्र कायम तोच …..विश्रब्ध ….
© वर्षा पतके थोटे
17-01-2019
Leave a Reply