तूं स्त्री, रूप तुझेच चराचरी
स्वरूप तुझेच, विश्वगाभारा
सत्य! वास्तवी तूच गे ईश्वर
सृष्टीतील तूंच वात्सल्यधारा।।
तू जननी, तूच गे आदिमाया
तुझा सन्मान, तुझेच चारित्र्य
दान ईश्वरी ऐश्वर्य सुखशांतीचे
तूच सात्विक, ईश्वरीय सुंदरा।।
तुझ्याच गे रूपात शब्दगंगोत्री
अंतरातुनी, भाव अमृती सारा
भरताच अलवार या ओंजळी
स्पर्षतो तृप्तलेला विंझणवारा।।
भाव गंधलेले तव रूप आगळे
भुलवुनी जाता तनमनांतराला
साक्षात ओघळतेस काव्यरुपी
तव रुपात रंगतो ब्रह्मांड सारा।।
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ७४.
दिनांक : ८ / ३ / २०२२.
Leave a Reply