कोमल वेलिवर
कळीने उमलावे
फुलुनी फुलावे
गंधुनी गंधाळावे…
प्रसन्न चराचरी
मनमन दरवळावे
नेत्री विठ्ठलविठ्ठलु
भक्तितुनी पाझरावे…
परब्रह्म ते सावळे
गाभारी प्रकट व्हावे
कृतार्थ आत्मरूप
विठ्ठल चरणी रमावे…
विश्वरूप ते गोजीरे
टाळमृदंगात भजावे
दिंडीपताका वैष्णवी
शिरी धरूनी नाचावे…
******
— वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३००
२१/११/२०२२
Leave a Reply