नवीन लेखन...

विश्वासराव पेशवे

विश्वासराव पेशवे हे नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांचा जन्म २ मार्च १७४२ रोजी झाला. नानासाहेब व गोपिकाबाई यांचा पुत्र विश्वासराव पेशवे हे सर्व पेशव्यांत फार सुंदर होते. हे लहानपणापासून राज्यकारभारांत पडला होता व युध्दाच्या मोहिमांवरहि जात असे. निजामावरील सिंदखेडच्या स्वारींत विश्वासराव यांना मुख्य सरदार करून दत्ताजी शिंद्यास याचा कारभारी नेमलें होतें. विश्वासराव व जनकोजी जवळ जवळ सारख्याच वयाचे असल्यानें त्यांच्यांत अखेरपर्यंत मैत्री होती. या मोहिमेंत औरंगाबादेस व शिंदखेडास मराठ्यांनीं निजामाचा सपशेल पराभव केला. या युध्दांत विश्वासराव व जनकोजी या दोघांनींहि चांगला पराक्रम गाजविला. उदगीरच्या लढाईत ही भाउसाहेबांच्याबरोबर विश्वासराव हजर होते, त्यात त्यांनी हत्तीवरून तिरंदाजी उत्तम प्रकारें केली होती. १७५७ मध्येंच नानासाहेबांनीं दहा हजार फौज विश्वासरावाच्या हाताखालीं स्वतंत्र नेमून दिली होती. उदगीरच्या लढाईनंतर भाऊसाहेब पानिपतावर निघाले. भाउसाहेबांनीं दिल्ली शहर आगस्ट १७६० त हस्तगत केलें त्यावेळीं दरबार भरवून त्यांनीं सर्वांकडून विश्वासरावास नजरा करविल्या यावेळी विश्वासरावानें लष्करी दृष्टीनें किल्ल्याची पहाणी केली. या सालचा दसरा कुंजपुर्याास विश्वासरावाच्या नेतृत्वाखालीं मराठ्यांनीं केला. शेवटच्या दिवशी विश्वासराव व भाऊसाहेब आपल्या सैन्याच्या मध्यभागांत प्रथम हत्तींवर बसून लढत होते. १४ जानेवारी १७६१ रोजी सकाळीं ८ वाजतां लढाईस सुरवात झाली. दुपारीं विश्वासराव हत्तींवरून उतरून दिलपाक घोड्यावर बसला. त्याला तिसर्या प्रहरीं छातींत गोळीं लागली व तो तत्काळ गतप्राण झाला. जवळच भाऊसाहेब होते; त्यांनीं रावाचें शव हत्तीवरील अंबारींत ठेवविलें. व ते शेवटच्या निराशेनें शत्रूच्या सैन्यांत घुसले. विश्वासराव पडेपर्यंत मराठ्यांचाच जय होता. तो पडल्यानें भाऊसाहेब खचले व भाऊसाहेब दिसेनासे झाल्यानें मराठी सैन्य फुटलें आणि गिलचे विजयी झाले. विश्वासरावाच्या शवाचा हत्ती सुजाउद्दौल्यानें आपल्याकडे नेला; परंतु अब्दालीनें शव आपल्याकडे मागून घेतलें. अखेर एक लक्ष रू. दंड भरून गणेश वेदांती, काशीराज वगैरे मुत्सद्दयांनीं शव सोडवून आणलें व त्यास आणि भाऊसाहेबांचें शव शोधून काढून त्यासहि अग्नि दिला.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..