स्मृतिदोषचि तो आम्हां शिकवी, जीवन सुसह्य बनविण्याते
अटळ असूनी प्रसंग कांहीं, दुर्लक्ष करितो आम्ही त्याते…१,
माझ्यातची तो ईश्वर आहे, आम्हास जाणीव याची असते
शोधांत राहूनी त्याच्या, जीवन सारे फुलत राहते…२,
मृत्यू घटना कुणा न चुकली, परि आठवण येई न त्याची
विस्तृत योजना मनी आंखतां, काळजी नसते पूर्णत्वाची…३,
विसरूनी जावूनी त्या मृत्यूला, जीवनांत तो रंग भरी
प्रेम करितो जीवनभर, देह असला नाशवंत जरी…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply