राजकुमार हा कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अभिनेता होता. त्यामुळे त्याचा अभिनय दुर्लक्षित राहीला. लक्षात राहिले त्याची इतरंबद्दल केलेली विधाने.
त्याचे खरे नाव कुलभूषण पंडित जन्म बलुचिस्तान लोरलाई येथे ०८/१० /१९२६ रोजी झाला.वडिलांचे नाव जगदीश्वर राय व आईचे नाव धानराज राणी ते काश्मिरी पंडित होते. वयाच्या १४ व्या वर्षी तो मुंबईत आला. त्याला अनेक येत,काश्मिरी उर्दू, हिन्दी,पंजाबी, संस्कृत यावर त्याची हुकूमत होती. त्याला सब इन्स्पेक्टर ची नोकरी मिळाली.इन्स्पेक्टर असताना पानाच्या दुकानावर त्याची एकाशी बाचाबाची झाली राजकुमारने त्या माणसाला खूप मारले व त्यात तो माणूस मेला. कोर्टाने एक वर्षांची शिक्षा केली . त्याची देहयष्टि बघून त्याची मैत्रीण त्याला चित्रपटात येण्यासाठी आग्रह करू लागली.पण त्याला चित्रपटात रस नव्हता. त्याच्या मैत्रिणीने त्याचे फोटो एका निर्मात्याला दिले. त्याला राजकुमार हीरो म्हणून आवडला. त्याचा पहीला चित्रपट होता रंगिली, १९५३ मध्ये आबशार आला. १९५७ साली मदर इंडिया आला.उजाला मध्ये तो शमीकपूरला भारी पडला. पैगांम मध्ये तो दिलीपकुमार समोर उभा राहिला.इथपर्यंत ठीक चालले होते,पण त्याला वक्त मिळाला आणि त्यात तडफदार संवाद मिळाले आणि जानी शब्द मिळाला. तेव्हापासून तो त्याचा परवलीचा शब्द बनला. आपली वेगळी संवादफेक बनवली. चराचरात हवा भरलेली असते. पण तीच हवा जर डोक्यात शिरली कि मेंदूचा आणि विवेकबुद्धीचा संपर्क तुटतो. तेच राजकुमारचे झाले.(राजकुमार भक्ताना राग येईल ) त्याचे दुसऱ्याचा अपमान केल्याचे कित्येक किस्से त्याचे खरे होते,काही त्याच्या नावावर खपवले गेले.
रामानंद सांगरने त्याला १९६८ मध्ये आंखे चित्रपटासाठी विचारले.राजकुमारने आपल्या कुत्र्याला बोलावले व विचारले “तू हा रोल करशील का ?” थोड्यावेळाने तो म्हणाला “ बघ माझा कुत्रा सुद्धा नाही म्हणतो मग मी का करू ?”मेरा नाम जोकर साठी राजकपूरने त्याला विचारले तो म्हणाला “मी फक्त सोलो रोल करतो”मनोजकुमार आणि धर्मेंद्रशी माझी तुलना करू नकोस” राजकपूर म्हणाला “तू हत्यारा आहेस” राजकुमार म्हणाला “ मी काही तुझ्याकडे रोल मागायला आलो नाही तूच आलास.” जंजीरच्यावेळी प्रकाश मेहराने राज कुमारला विचारले तो म्हणाला “ मी काम केले असते,पण तू डोक्याला चमेलीचे तेल लावले आहेस आणि मला त्याचा वास आवडत नाही.” तिरंगा चित्रपटात नाना पाटेकर होता त्याने मेहुलकुमारला विचारले “ ब्रिगेडियरचा रोल कोण करणार “ मेहुल म्हणाला राजकुमार. नाना म्हणाला “तो जर मला उलटसुलट बोलला तर मी फिल्म सोडून जाईन.” शूटिंग झाले की दोघेही वेगवेगळ्या दिशेला जात.एकदा त्याने दिलीपकुमारला विचारले” इतने दिन कहा थे “ दिलीप म्हणाला “लंडन गया था” राज म्हणाला “ उसमे कौनसी बडी बात है मुकरीभी आजकल लंडन जाता है “३६ वर्षाने सुभाष घईने दोघाना सौदागार मध्ये एकत्र आणले. राज म्हणाला माझ्या नंतर चांगला अभिनेता दिलीप आहे ,राजला निसर्ग न्याहाळचि सवय होती. सौदागार च्या ब्रेक मध्ये राज दूर कड्याच्या टोकावर खुर्ची टाकून निसर्ग बघत होता. पुन्हा शूटिंग च्या वेळी शोधाशोध झाली तेव्हा राज सापडला, दिलीप म्हणाला,” राज पडला असतास तर मेला असतास,”राज म्हणाला “हमारा नाम राज है और राज कुत्ते की मौत नही मरा करते.” गोविंदाला तो म्हणाला होता“तूम आर्टिस्ट अछेहो लेकिन हिरोईन को भी नाचनेका मोका दो “बप्पी लहरी कायम सोन्याने मढलेला असे त्याला राजकुमार म्हणाला “अंगावर इतके दागिने आहेत फक्त मंगळसूत्र हवे आहे”
त्याचे वागणे कसेही असले तरी त्याला नियमित चित्रपट मिळत होते.त्याचे खाजगी व सार्वजनिक जीवन अगदी वेगळे होते. तो फॅमिलीला घेऊन कधीही पार्टीत जात नसे. त्याने एकूण ७० चित्रपट केले. त्यातले बहुतेक गाजले. त्याचे दुर्दैव असे की ज्या आवाजाच्या जोरावर तो चित्रपट खेचून नेत होता त्या आवाजानेच त्याला धोका दिला. त्याला घशाचा कॅन्सर झाला. बोलणे बंद झाले. त्याने संगळ्यांशी संबंध तोडले. तो फक्त चेतन आनंद शी खूणेने बोले. त्याने घरच्याना सांगून ठेवले होते की त्याच्या मृत्यूची बातमी अंत्यसंस्कार होई पर्यन्त कोणाला कळता नये. त्याचे निधन ३ जुलै १९९६ ला झाले अंत्यसंस्कार झाले आणि नंतर हि बातमी माध्यमाना देण्यात आली.
रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply