स्थापना : ३ आक्टोबर १९५७
आज विविधभारती साठ वर्षाची झाली.
जेव्हा भारतात जनतेच्या मनोरंजनासाठी वाहून घेतलेली कोणतीही वाहिनी नव्हती, तेव्हा विविध भारतीचा उदय झाला. त्या वेळी रेडिओ सिलोन हे एकमात्र विरंगुळ्याचे साधन होते. संगीताच्या सुवर्णयुगात नागरिकांसाठी मनोरंजन वाहिनी सुरू करण्याची कल्पना सुचली आणि विविध भारती सेवेला प्रारंभ झाला. ३ आॅक्टोबर १९५७ रोजी आकाशवाणीवरून शीलकुमार शर्मा यांच्या आवाजात पहिली उद्घोषणा झाली, ती अशी ‘यह विविध भारती हैं, आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम’ विविध भारतीवर पहिले गाणे ऐकवण्यात आले, ते होते ‘नाच रे मयूर’… विविध भारतीचे आद्यप्रवर्तक पंडित नरेंद्र शर्मा यांनी ते लिहिले होते आणि मन्ना डे यांनी ते गायले होते. अनिल विश्वास यांनी संगीत दिले होते. विविध भारतीवरून शास्त्रीय संगीताचा खजिना, महान कलाकारांच्या मुलाखतींचे कार्यक्रम देखील सादर केले गेले.
सुमारे सहा दशकांच्या प्रवासानंतरही आजच्या आधुनिक प्रसारण युगात इतर एफ.एम चॅनेलच्या भाऊगर्दीत विविध भारतीची पकड मजबूत आहे. सुरुवातीला ही सेवा दिल्लीमध्ये होती. १९७२-७३ मध्ये मुंबईत चर्चगेट येथे विविध भारतीचे प्रसारण हलवण्यात आले आणि १९९८-९९ मध्ये अखेरीस ते बोरीवली येथे हलवण्यात आले. १ मे २००० रोजी थेट प्रसारण सुरू झाले, तर १६ डिसेंबर २००४ रोजी डीटीएच सेवा सुरू झाली.
जयमाला,छायागीत, पिटारा, हवामहेल,उडाला उनके यादोंका,संगीत सरीता,बेला के फ़ूल,आज के फनकार,असे अनेक कार्यक्रम अजुनही लोकप्रिय आहेत. शांत, संयमी सुरात, आणि ते लावत असलेल्या गाण्याप्रमाणेच श्रवणीय आवाज असलेले विविधभारतीवरील निवेदक कमल शर्मा, युनूस खान असोत वा ममता सिंग, रेणू बंसल व इतर या साऱ्याची वैशिष्ठ्य वेगळी,उच्च हिंदी भाषा आणि बरच काही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply