संपलेल्या दिवाळीचे कवित्व अजून बाकी आहे
आहे पणती अजुनी वात तिची विझली आहे
दारातील आकाशदिवा अजूनही तसाच आहे
दिवा त्यात कोण लावील आता तो बेकार आहे ।
पाडवा आणी भाऊबीजेचे कोणास कौतुक आहे
कसले ऊटणे कसले तेल मोतीसाबण व्यर्थ आहे
आता आपला नेहमीचा हमाम साबण खरा आहे
गरम पाणी मिळणे आता नशीबाचा भाग आहे ।
दिवाळी संपली महत्त्व संपले हे असेच सुरु आहे
माणूस काय पणती काय नशिबी भोग तोच आहे
ऊपयोग संपून गेल्यावर किंमत त्याची शून्य आहे
घरातील एखादा कोपऱा हीच खरी जागा आहे ।
— सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
१२ नोव्हेंबर २०१८