27 फेब्रुवारीच्या जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्तानं….
सोपी मराठी … प्रवाही मराठी … अुत्क्रांत मराठी … समृध्द मराठी…. :: मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर
पारंपारिक स्वर : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार…अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार…. अहा..), ऋ (र्हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ (र्हस्व आणि दीर्घ) असे अेकूण 16 स्वर आहेत.
इ ई उ ऊ ए ऐ या स्वरचिन्हांअैवजी अि, अी, अु, अू, अे अै ही चिन्हे स्वीकारावी.
आ, ओ, औ ही स्वरचिन्हे आपण आधीच स्वीकारली आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, सुमारे 85 वर्षांपूर्वी, भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे….क ला वेलांटी लावली तर ‘की’ होते आणि ते आपण स्वीकारलं आहे तर अ ला वेलांटी लावून ‘अि’ का स्वीकारू नये? त्यानुसार इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या चिन्हांबद्दल (अक्षरांबद्दल..स्वरांबद्दल..) अि, अी, अु, अू, अे अै ही चिन्हे स्वीकारावी.
आ, ओ, औ, अं ही स्वरचिन्हे आपण आधीच स्वीकारली आहेत. अशारितीनं अ ची बाराखडी जर आपण स्वीकारली तर, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या स्वरचिन्हांची आवश्यकता राहणार नाही.
इंग्रजी dictionary मधे जवळपास ७०% शब्दांच्या उच्चारात अॅ किंवा आॅ हे स्वर/उच्चार आढळतात. उदा. action, traction, pack, knowledge, college, ox, fax, rock इत्यादी. पण मराठी किंवा संस्कृत भाषेमधे अॅ किंवा आॅ हे उच्चार असलेला एकही शब्द नाही… मराठी बाराखडीतही अॅ किंवा आॅ हे स्वर नाहीत.