सरत्या आषाढात बरसला मुसळधार
शेती झाली हिरवीगार
नद्या, तळी, धरणे भरली काठोकाठ
पाण्याची चिंता टळली पाठोपाठ
आषाढा नंतर आला श्रावण
नभ मेघांनी आले दाटून
रिमझिम बरसती धारा सुंदर
ऊन पावसाचा खेळ अधीर
श्रावण सरींनी केले नृत्य
मस्त मयुरी येई ठुमकत
इंद्रधनुचे बांधून तोरण
करी रंगांची उधळण
श्रावण सोमवारी भोलानाथ वारी
श्रावण मंगळवारी नव्या नवरीची मंगळागौरी
नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि
विविध व्रत-वैकल्याने नटला श्रावण !
जगदीश पटवर्धन
Leave a Reply