नवीन लेखन...

वृक्षारोपण

आओ काका काय करताय
चारही मूलं झाडाभोवती उभे राहतात.
झाडतोड्या- बाजूला व्हा लागेल तुम्हाला
मूलं- मग या झाडाला नाही का लागणार?
झाडतोड्या काही बोलणार इतक्यात…. हाहाहा असा हसलेला आवाज येतो सर्वजण इकडे-तिकडे पाहू लागले.
अरे मुलांनो इकडे-तिकडे काय शोधताय मी तुमच्या मागे उभा आहे…… मूलं मागे पाहतात तर झाड बोलत असत… मूलं आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात.
झाड – मुलांनो सर्व प्रथम मी तुमचे आभार मानतो माझे प्राण वाचविल्या बद्दल
मूलं स्माईल करतात आणि – अहो झाडदादा आभार काय मानताय आज आम्ही तुमचे प्राण वाचविले असले तरी तुम्ही दिलेल्या प्राणवायू वरच आम्ही जगतोय ना? मग आम्ही तुमचे किती आभार मानले पाहिजे हो ना काका… असे म्हणून झाडतोड्या कडे पाहतात. झाडतोड्या कुर्हाड खाली टाकून माफी मागतो
झाड – मीच नाही माझे सर्व बंधू सुध्दा हे काम करतात देवाने दिलेल्या चांगल्या शक्ति चा उपयोग चांगलाच झाला पाहिजे….. पण मुलांनो तुम्ही ही ऐकलच असेल कोण्या एका शहरात माझ्य अनेक मित्रांचा खून केला गेला पण कोणिच काहीच करू शकल नाही. हे ऐकूण जिवाची लाहीलाही झाली होती
झाडतोड्या – दादा आम्ही तरी काय करणार मालकानी हुकूम दिल्यावर
झाड – आम्ही काय करणार हे सर्वच बोलतात पण मी काहीतरी करू शकतो  म्हणणारे इतिहासकारच
मूलं- दादा आम्ही निघतो
झाड – जाण्याआधी एक ऐकाल का माझ?
मूलं – हो….
झाड – अरे काय सांगतो ते तर ऐका तुमचे शिक्षक सांगतच असतिल झाडे जगवा झाडे लावा
मूलं- हो ही पाटीही वाचली आहे आम्ही
झाड – पण फक्त रोप लावून सोडून देवू नका. तुम्ही मला दादा म्हणताय  पण, मी तुमच्या वडिलांपेक्षा ही खूप मोठा आहे…. तुमच्या पूर्वजानी मला जन्म दिला  मला वाढवल माझ पालन पोषण केल त्याचा फायदा आज तुम्हाला होतोय. तर आज जी झाड तुम्ही लावाल (एक क्षण  थांबत) म्हणजे रोप लावून सोडून देवू नका, त्यांची निगा राखा, खतपाणि घालून त्याना वाढवा… त्याचा फायदा तुमचे वारसदार घेऊ शकतिल.
मूल – नक्की काका आम्ही प्राॅमिस करतो
चौघेही एकमेकांच्या हातावर टाली देतात… झाड समाधानान हसत आणि मूल घराकड निघतात
एक मूलगा – वारसदार म्हणजे काय?
दुसरा – अरे माझे बाबा माझी ओलख हा माझा वारसदार
मूलं- म्हणजे आपली मूल  (जोरात) ईईईईईईईई
बोलत बोलत घराकडे पोहचतात…. घरं आजूबाजूलाच असल्यामुले… रात्री जेवण झाल्यावर एकत्र भेटतात…झाड कुठ कशी लावायची ते ठरवण्याचा प्रयत्न करतात पण काहीच ठरत नाही… दुसर्या दिवशी शालेत ही तोच विषय होतो पण, आता चर्चेत वर्गातिल बरेचजण जाॅइन होतात शेवटी क्लास टिचरांच्या मदतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठरतो… घरी खाल्लेल्या फलांच्या बियांचा वापर करून तसेच काही काही रोपं विकत आणून, गावा बाहेरच्या  डोंगरावर रोपं लावली जातात  प्रत्येकी दोन याप्रमाणे जवलपास शंभर रोपं लावली जातात. याच प्रमाणे बाकीच्या वर्गातील मूलंही हा कार्यक्रम करतात…. प्रत्येकी ४ते५ मुलांचा ग्रुप तयार करतात ठरलेल्या तारखेला जावून खतपाणि घालून निगा राखली जाते….. हलूहलू झाडं वाढू लागली, मूलंही मोठी होवू लागली… शाला- काॅलेजच शिक्षण पूर्ण झाल… काही मूलं शेती करू लागली.. काही व्यवसाय तर काही आजू बाजूच्या शहरांत कामाला जाऊ लागली… बाकी राहिलेल्याना नोकरी निमित्त त्याच शहरात जाव लागल  ज्या शहरात काही वर्षांपूर्वी बर्याच झाडांचा बली दिला होता…
ते शहर खूप अगोदर पासूनच प्रगतिशील शहर होत. त्याच्या प्रगतीत अजूनच वाढ झाली होती… शहरातले सगलेच रहवासी बहुतेक श्रिमंतच होते हे त्यांच्या राहणीमाना वरून लक्षात येत असे… देशातील प्रत्येक प्रांताचे लोक इथ वास्तवास असल्यामुले प्रत्येक प्रांताच्या पोषाखा सोबत विदेशी पोषाखही सहज पहायला मिलत…. काही ठिकाणं तर अशी होती, जी पाहिल्यावर परदेशात गेल्याचा भास होत असे…..
सुख, समृद्धि ने ऐश्वर्य पूर्ण असच होत हे शहर….जीवनावश्यक गोष्टींची तर काहीच कमी नव्हती, देशातूनच नाही तर अनेक बलाढ्य, श्रिमंत परदेशातूनही या वस्तू मागवल्या जात… अशी कोणतीच वस्तू या शहरात नव्हती जी पैशाने विकत घेवू शकत नाही.. वस्तूच काय पण नाती सुध्दा सहज विकत मिलत असत… एवढच नाहितर आॅक्सिजनचा मास्क ही सहज उपलब्ध होत होता पैशाने. आणि जर तुम्हाला जगायच असेल तर इतर वस्तूंच माहित नाही पण हा आॅक्सिजनचा मास्क विकत घ्यावाच लागायचा.
— तेजस्विनी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..