माणूस या चार फेज मधून जातो, शेवटची विकृती असते ती सर्वनाश करतेच करते. मग ती कुठीही असो, त्याचे नाते शेवटी विकृतीशी होते तेव्हा मात्र त्याचे त्याला कधीच भान रहात नाही. गृहकलह असो, समाजिक कलह असो किंवा राजकीय कलह असो किंवा कोणताही असो.
प्रत्येकाकडे कोणती ना कोणती वृत्ती असतेच असते .जसजसा तो मोठा होऊ लागतो , विचार करू लागतो , स्पर्धा बघू लागतो तेथे त्याची एखादी प्रवृत्ती दिसून येते अर्थात त्यावेळी तो नाटकही करत असेल किंवा आपल्याशी प्रामाणिक देखील रहात असेल .
तो जसजसा मोठा होऊ लागतो समाज किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर तो बघतो तेव्हा या प्रवृत्ती तयार होण्यास सुरवात होते. त्याला समजते आपल्याकडे काय चांगले आहे किंवा काय वाईट आपण त्याचा वापर कसा करावा ह्याचे ज्ञान होते. जसजसा तो अनेक बाबतीत समर्थ होतो तेव्हा त्याच्या मनामध्ये काही प्रतिमा , आकृती तयार होते , होय हा माणूस म्हणजे मीच . इथे मात्र एक अहंकार जोपासतो किंवा स्वतःबद्दल त्याची एक प्रतिमा तयार होते होय हा म्हणजे मीच.
पुढे तो या तिन्ही गोष्टीवर आपले लहान किंवा मोठे साम्राज्य उभे करू पहातो तेव्हा मात्र अग्रेसिव्ह होतो ,आणि आपल्या मार्गातील काटे कधी जबरदस्तीने तर कधी गोड बोलून दूर करू लागतो अर्थात हे गोड बोलणे स्लो पॉयझन ही असू शकते …आणि हो सर्व कोणतेही क्षेत्र असो हे त्यात घडते , राजकारण , खेळ किंवा लेखन ह्यात त्याची दादागिरी सुरु होते आणि बरोबर येथेच त्याचा खरा चेहरा दिसून येतो , तो हळूहळू आपले साम्राज्य पसरू लागतो. जसजसा अधीकार एक विकृतीत ट्रान्स्फर होतो तेव्हा समाजाला कळते तोपर्यंत त्याने आपले साम्रज्य पसरवले असते , आपली चेन मोठी केलेली असते .
मी जे सांगत आहे हे प्रत्येक क्षेत्रात घडते फक्त राजकारणात मात्र ते प्रकर्षाने जाणवते कारण त्याचे परिणाम प्रकर्षाने जाणवतात कधी भयावह तर कधी सायलेन्टली विनाशाकडे नेणारे.
ही मानवी प्रवृत्ती आहे . म्हणे जंगलातले प्राणी सिहाला राजा मानतात पण त्यांना हे जाणवत नाही हा त्याच्या भुकेसाठी आपलीच शिकार करणार आहे.
मानवी भूक आणि जनावरांची भूक यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे . जनावर भूक लागली की शिकार करते तर माणूस भूक लागो न लागो तो शिकार करतच असते आणि इथेच तो विकृतीकडे जातो …
..आणि त्यानंतर त्याचा विनाश अटळ असतॉ, बहुतेक क्रूरपणेच.
सगळ्याच्या मुळाशी आहे अघोरी अहंकार.
आपणच ठरवायचे आपण करावयाचे अगतिक समर्थन किंवा गप्प राहून वाट बघायाची नियतीच्या आसुडाची ?
सगळेच व्यक्तिसापेक्ष ?
सतीश चाफेकर
Leave a Reply