जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना ।
कांहीं तरी मागत होते, हात जोडूनी चरणा ।।
दयावान ती आहे समजता, गर्दी होते तिजपाशीं ।
कधी न दिले काहींहीं तिजला, मग ही मागणी कशी ? ।।
जावू नका दर्शनास तिच्या, रिक्त अशा त्या हाताने ।
तिला पाहिजे ताट पूजेचे, भरलेले भक्ती भावाने ।।
व्यर्थ होवून जाती ते श्रम, भक्तीभावाच्या अभावी ।
उभे आयुष्य वाऱ्या करूनी, हाती काही न येई ।।
मानव रूप देऊनी तिजला, धनादी वस्तू अर्पिती ।
पूजाविधींचा थाट करूनी, मोठेपणा दर्शविती ।।
भक्तीची ती भुकेली असूनी, काही न लागे तिजला ।
केवळ तुमचे भाव जाणूनी, सर्वच मिळेल तुम्हाला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply