नवीन लेखन...

व्यवसाय

दोघी मैत्रिणी बोलत असतात. दोघी गृहिणी असतात. एक जण दुसरीला सांगते “अगं, मी ड्रायव्हिंग लायसेन्स काढायला गेले तर तिथल्या अधिकाऱ्याने मला विचारले तुमचा व्यवसाय काय? मी म्हणाले मी आई आहे” त्याने तुच्छपणे माझ्याकडे पाहिले आणि तो म्हणाला “म्हणजे तुम्ही काही उद्योगधंदा करत नाही तर तुम्ही नुसत्याच गृहिणी आहात. मी त्या कॉलममध्ये गृहिणी असे लिहितो.”

दुसरी मैत्रिण ते बोलणे लक्षपूर्वक ऐकत असते. सर्वच गृहिणींना अशा प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते हा सगळ्यांचाच अनुभव असतो. त्याच्यावर तोडगा म्हणून दुसरी मैत्रिण एक युक्ती करते.

ती जेव्हा स्वत:च्या लायसेन्ससाठी जाते तेव्हा तिची गाठ एका जनसंपर्क अधिकाऱ्याशी पडते. जनसंपर्क अधिकारी एक बाई असते. मोठी थाटात असते. ती हिला विचारते “तुमचा व्यवसाय काय? ”

मैत्रिण म्हणते “मी बालविकास, संगोपन आणि अंतरव्यक्ती संबंध यातली संशोधन सहायक आहे.”

ती बाई चाट पडते. मैत्रिणीकडे बघतच राहाते. मैत्रिणीचे बोलणे लिहून घेते. तरी तिला मैत्रिणीबद्दल अधिक उत्सुकता असल्यामुळे ती विचारते “म्हणजे तुम्ही नेमके काय करता?”

मैत्रिण शांतपणे आणि आत्मविश्वासाने तिला सांगते “माझा संशोधन प्रकल्प वर्षांनुवर्षे चालू आहे. (आईला निवृत्ती नसते) हे संशोधन घरात व बाहेर दोन्हीकडे करावे लागते. मला आजवर दोन पदव्यांनी भूषविण्यात आले आहे. (एक मुलगा एक मुलगी) समाजशास्त्रातला माझा विषय सर्वात कठीण समजला जातो. रोजचे जवळ जवळ चौदा तासांचे काम असते. कधी कधी तर चोवीस तासही कमी पडतात. इथे अनेक आव्हाने पेलावी लागतात. याचा मोबदला जास्तीवेळा पैश्यात न मिळता मानसिक समाधानात मिळतो.”

मैत्रिणीचे बोलणे ऐकून ती बाई चकीत होते. तिला त्या मैत्रिणीबद्दल नितांत आदर वाटू लागतो. फॉर्म पूर्ण भरुन ती मैत्रिणीला दारापर्यंत सोडायला जाते. मैत्रिण घरी आल्यावर पाच वर्षाचा तिचा प्रयोगशाळा मदतनीस तिचे स्वागत करतो. तेवढ्यात बेडरुममधून नवीन प्रयोगाचा (सहा महिन्याचे लेकरु) खणखणीत आवाजातला रियाझ ऐकू येतो.

मैत्रिणीने आज शासकीय लालफितीवर विजय मिळवलेला असतो. मानव जातीला अत्यावश्यक अशा सेवेत एक उच्च पदस्थ संशोधन अधिकारी म्हणून तिची नोंद झालेली असते.

याच विचारप्रणालीनुसार आजीला या विषयातली वरिष्ठ संशोधन अधिकारी, पणजीला प्रकल्पाची निदेशक आणि मावश्या, आत्या, काकू या उपसंशोधन अधिकारी म्हणून त्यांची नोंद व्हावी म्हणजेच आई होण्याचे खरे सार्थक होईल.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..