“काय मग ढमढेरे,सकाळी सकाळी स्वारी मॉर्निंग वॉकला निघाली वाटतं.कायवजन कमी करताय म्हणे……करा हो वजन कमी ….! सुभेच्छा तुम्हाला.चांगलं पाच पंचवीस किलो तरी वजन कमी झाले पाहिजे हो.”
शेजारचा कुचळ आगलाव्या मला ट्रॅक सुटवर घराबाहेर पडतांना बघुन म्हणाला.हा आगलावे म्हणजेना,एक नंबरचा डॅंबिस मानुस…कधीही सरळ बोलणार नाही.ह्याच स्वतःच्या घरच्यापेक्षा ईतरांच्याच घरात जास्त लक्ष असत.अगदी ह्याचा एक कान शेचजार्याच्या भिंतीला कायमच चिकटलेला असतो.कदाचित त्याच्या ह्या सवयीमुळेच त्याचे कान लांब व पसरट तर दुसर्याच्या घरात नको तेवढं नाक खुपसण्याच्या सवयीमुळेच ह्याचे नाकही लांब व तिरकं झालेल असेल कदाचित…!
असो तर तसा मी चांगला खात्या पित्या घरचा असल्याने शरीर बांध्याने एकदम सुदृढ.आत्ताच्या भाषेत लोकं त्याला ‘ओबेज’ वगैरे म्हणायला लागलेत एवढच.पण आमच्या सतरा पिढ्यांपासुनची ढमढेर्यांची परंपरा मी जपुन होतो. तसं पाहीलं तं आमच्या पुर्वजांपासुनच सगळे खाऊन पिऊन सुखी…!खाने,पिने आणि मस्तपैकी झोपणे हिच आमची परंपरा….! घरच्या गडगंज संपत्तीमुळे फारसी कुणाला अंगमेहनत करायची गरजच पडली नाही.त्यामुळेच कदाचीत त्या लंबोदरालाही हेवा वाटावा असे आमचे ‘हे’ उदर….! आमच्या शेंडफळांपासुन ते बुडपळांपर्यंत सगळ्यांचेच उदर हे एकदमच अघळ पघळ…..अगदी आमच्या आडनावाला शोभणारे…..!
आसच पाच सात दिवसांपुर्वी अचानकच अस्वस्थ वाटत आसल्याने आमच्या सौ.मला आमचे पारिवारिक डॉक्टर,डॉ.लकडे यांच्याकडे घेऊन गेल्या. डॉ.लकडे आपल्या आडनावाप्रमाणेच अगदी शिडशिडीत बांध्याचे.माझ्यापुढे तर ते असे वाटायचे जणु काही हत्ती समोर उंदिरच…! तर डॉ.लकडेंनी काही जुजबी तपासण्या करत माझा बि.पी.ही तपासला.१७०/१२० हे त्या बि.पी.मिटरवरील आकडे पाहुन अगदी गंभिर भाव भावनांचा कल्लोळ कपाळावर नाचवत त्यांनी मला काही रक्तचाचण्या करायला त्यांच्याच दवाखाण्यातल्या सिस्टर सु.ई.टोचे (सुनिता ईश्वर टोचे) यांच्या हवाली केले.सिस्टर सु.ई.टोचेंनी मला लॅबमध्ये नेऊन माझ्या दंडावर घट्ट पट्टी बांधुन मला हाताची घट्ट मुठ बांधायला सांगीतली.एक भलीमोठी सुई लावलेले ईंजेक्शन त्यांच्या हातात बघुन मला एखाद्या सावजाला हेरून शिकारीस बसलेल्या शस्त्रसज्ज शिकार्याची आठवण येत होती.मी त्यांच्याकडे बघुन अगदी बारीक तोंड करून बसलो होतो.मला लहानपणा पासुनच ईंजेक्शनची प्रचंड भिती वाटत होती.मी चुळबुळ करू लागलो. सिस्टर सु.ई.टोचेंनी माझी नस शोधायला सुरूवात केली त्यांना माझ्या मांसपेशीमधील रक्तवाहिन्या काही हाताला लागत नव्हत्या.महत्प्रयासाने त्यांना एक रक्तवाहिनी सापडली.माझ्या शरीरातील मांसांच्या जंजाळातून ती रक्तवाहिनी सापडल्यावर जसे काही वाळवंटात ओॲसीस सापडले असावे अशा भावनेने त्या आनंदाने चित्कारायच्याच राहील्या होत्या.आत्ता त्याच आनंदाच्या भरात त्या माझ्या मनगटावर सुई टोचणारच एवढ्यात मी पेशंट बेडवरून टुनकन उडी मारून दरवाज्याकडे पळायला लागलो.त्याक्षणी मला दवाखाण्यातली खाट ते दरवाजा हे अंतर मैलो न मैलांचे भासत होते.दरवाज्यापर्यंत धावताना मला धाप तर लागलीच होती सोबतीला माझे कपडेही ओलेचिंब झाले होते.एवढ्या महत्प्रयासाने मी दरवाज्यापर्यंत कसाबसा पोचलो न पोचलो तोच दरवाज्यात आमची ‘हि’ कंबरेवर दोन्ही हात ठेऊन माझ्या स्वागताला तयारच होती.तिला बघुन राणाभिमदेवी थाटात पळालेला माझ्यातला रणविर क्षणार्धात गर्भगळीतच झाला.तिचा आविर्भाव पाहुन माझ तर आवसानच गळुन गेल आणि नाईलाजाने मी माघारी वळालो.आत्तापर्यंत सिस्टर सु.ई.टोचेंना माझ सुईबद्दलच प्रेम माहीत झालं होतच.त्यांनी दोन आडदांड वॉर्ड बॉयना माझा दंड पकडुन ठेवण्यासाठी बोलाऊन घेतलं.सिस्टर सु.ई.टोचेंची ईंजेक्शनला लावलेली सुई जसजशी माझ्या हाताजवळ येत होती तसतशी माझी अवस्था नाजुक होत होती.माझ्या सर्वांगावरील रोम रोम उभे राहत सिस्टर सु.ई.टोचेंच्या सुईला सलामी देत होते.सिस्टर सु.ई.टोचे रक्त चाचण्यांकरीता माझे रक्त घेत होत्या.ते दहा मि.ली.चे लंब वर्तुळाकार रक्तसंकलनपात्र आत्ता मला ह्यावेळेस एखाद्या पाण्याच्या टॅंकरसारखे जाणवायला लागले होते.अहो घड्याळ तर सोडाच पण काळही थांबल्याचे मला जानवत होते आणी ईकडे सिस्टर सु.ई.टोचे मात्र अविरत रक्त काढुन घेत होत्या.शेवटी एकदाचा रक्तमोक्षनाच्या त्या दिव्यातुन माझी सुटका झाली आणि मी रक्तचाचणीच्या त्या आखरी पडावाला यशस्वीरित्या पार केले.
दुसर्या दिवशी सकाळीच लवकर उठुन स्नान वगैरे उरकुन मंदिरात गेलो.आज माझ्या रक्तचाचणीचा निकाल येणार होता.मी कधी नाही ते सपत्नीक भक्तीभावाने देवदर्शनाला मंदिरात गेलो.तसे पाहीले तर शालेय दिवसांनंतर परीक्षेच्या निकालाचे दिवस सोडले तर मी मंदिरात गेल्याचे मला फारसे आठवत नव्हते.त्या दिवसांत देवाने मला कायमच तोंडघशी पाडल्यामुळे मी कायमच देवाला खुन्नस देत आलो होतो, परंतु अवघड काळात सामान्य माणसाला जशी देवाची आठवन येते तसच माझही झालं होत.मी अजुनही सामान्यच होतो यावर ते शिक्कामोर्तबच होत म्हणा की.मग भक्तिरसात लीन होऊन अत्यंत भक्तिभावाने देवाच्या पाया पडुन सर्व काही सुरळीत व्हावे म्हणुन देवाकडे हात पसरले.मी डोळे लावुन साक्षात ईश्वराशी संवाद साधत होतो.मी मागच्या अनुभवावरून देवाला म्हटल,“हे परमपित्या,दयाघना,दयासागर ईश्वरा तुला आठवतच असेल दर ईयत्तेचा निकाल यायच्या आधी मी आधी तुझ्या दर्शनाला येत असे आणि मला जास्त मार्क्स मिळावेत म्हणुन तुला भजत असे परंतु तु कधीच मला पावला नाहीस आणी मी कायम काठावर पास संघटणेचाच सदस्य राहीलो.तरी असो, यावेळेस तरी लक्ष ठेव हि तुला ह्रदयातुन कळकळीची विनंती रे देवा.” देवाला विनंती करताच मंदिर परिक्रमा संपवुन मी थेट डॉ.लकडेंकडे निघालो.सकाळची वेळ असल्याने ओ.पी.डी.त फारशी गर्दी नव्हती.लवकरच माझा नंबर आला आणि केविलवाणा चेहरा घेऊन मी डॉ.लकडेंच्या दालनात प्रवेशलो.डॉ.लकडे आज कालच्यापेक्षा गंभीर वाटत होते.ते मध्येच माझ्याकडे बघायचे तर मध्येच रिपोर्टकडे बघायचे.त्यांची ही विचीत्र शैली बघुन माझ्या कपाळावर घाम जमायला लागला होता आणि पहिलेच माझा पडलेला चेहरा आणखीनच पडुन गेला.
“क…क….काय झाले डॉक्टर साहेब ठिक आहेत ना रिपोर्ट….!” मी कचरतच म्हणालो.
“अहो कसले ठिक घेऊन बसलात तुम्ही…अहो,तुमची शुगर,बी.पी, थायरॉईड, कोलेस्टेरॉल लेव्हल,सर्वकाही वाढलय….तुमच्या किडण्या ताणात आहेत तर लिव्हर तनावात….! वेळीच उपचार नाही केलात तर दुखनं हातचं निसटेल हो.” हे म्हणतांना डॉक्टर लकडे माझ्याकडे असे बघत होते की जस काही मी आत्ता मृत्युशय्येवर आहे आणी या माणवी विश्वाचा काही दिवसाचाच पाहुणा आहे.
डॉक्टरांचं अस बोलन ऐकताच आमच्या सौ.नी तर तिथेच हंबरडा फोडायला सुरूवात केली.कुणीतरी गचकलं की काय या शंकेने डॉ.लकडेंच्या दालनाभोवती लोकांनी जमायला सुरुवात केली. मी आपला केविलवानं तोंड करून बिच्चारा या शब्दाशी ईमान राखत होतो.सौ.च्या हंबरडा फोडण्याने तिथे गर्दी तर जमलीच होती आणि मी ही कावराबावरा होऊन डॉ.लकडेंकडे पाहात होतो.तेवढ्यात डॉ.लकडें गंभीर मुद्रा करत मला काही सुचना करत होते.“हं,तर ढभढेरे आजपासुन तुम्ही आत्ता काही पथ्य पाळायचे.दररोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचे.जमलेच तर योगाही करा.हलके फुलके व्यायाम करा.याउपर खाण्यापिण्याच्या बाबतीतही दक्षता घ्या.फार गोड-धोड,तेलकट,मसालेदार पदार्थ टाळा.आहारामध्ये ताज्या भाज्या व कडधान्याच प्रमाण वाढवा.रात्रीचे मोजकेच पण हवे तेवढेच जेवा.आणी हो सध्या आहे त्यापेक्षा किमान पंधरा किलो तरी वजन कमी करा.” डॉ.लकडेंच्या सर्व सुचना ऐकुन त्यांनी लिहुन दिलेले औषधं घेऊन मी घराला निघालो.रस्त्याने आमच्या ‘हिचं’ सारख टिपं गाळणं चालु होतं. घरी आल्यानंतर सर्वजनं माझ्याभोवती जमले होते.शेजारी पाजारीही आलते.आमच्या सौ.नी कालच सगळ्या गल्लीत माझ्या तब्येतीच तोंडी बुलेटिन फिरवल होत.दवाखान्यात गेल्यापसुन मला उगीच अशक्त असल्यासारख वाटायला लागल होत.त्यातच माझी दुपारची झोपायची वेळ झाली होती,परंतु समोर भेटायला आलेला गोतावळा असल्याने मला झोपताही येत नव्हते.गल्लीतले पंधरा ते विस शेजारी बारा बाय बाराच्या खोलीत बसल्याने त्या खोलीतल्या कोंदट वातावरणात मला गुदमरायला लागले होते आणि थकवा आल्याने म्हणा किंवा वंशपरंपरेनुसार दुपारी झोपायची वेळ झाल्याने म्हणा निद्रादेवी माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर नाचाचा थयथयाट करत होती.तेथे बसलेला जो तो आपापल्या परीने मला सल्ले देत होता आणि मी मुकाटपणे केविलवाणा चेहरा करून डुलक्या देत देत ते सल्ले ऐकत होतो.
“अहो,वैनी भावोजींना दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा ज्युस पाजा.वजन कमी होते हो त्यांने.” शेजारच्या काळभोरबाई म्हणाल्या. “छे हो, त्यापेक्षा कारल्याचा ज्युस पाजा.साखर नियंत्रणात राहते त्याने.साखर नियंत्रणात राहणे म्हणजेच सारे शरीर नियंत्रणात राहते बर का…!” मधातच कडु वैनींनी कडुपेरणी केली. “नाही हो,त्यापेक्षा मी तुम्हाला काही काढे सांगते.ते घ्या.नक्कीच फरक पडेल हो” वरच्या फ्लॅटमध्ये राहणार्या वैद्यबाई आपल्या गोड आवाजात म्हणाल्या.
“माका काय मंतो…” नाकात तपकिर ओढत लांब हेल घेत नारू आण्णा तंतोरे बोलते झाले.“माका खबर आशिल्लो एक बाबा आसा. तो सगळे रोग बरे करता. हांव कितें करतां ताका दाखोवचो.”
“ओय ना जी ना….. नारू आण्णा,इथ्थे बाबाजीदा काम नही हें जी….मुख्या समस्या तो वजन दी है…तो पह्यले वजन घटादो जी…मैनु तो बोलता हुं की तुस्सी कोई जिम फिम जॉईन करोजी…” सरदार बलवंतसिंग आपल्या पंजाबी अंदाजात बोलले. “मी काय मंतो बे, त्यापेक्षा आजकाल ते ऑनलाईन झुंबा फिंबा चाललेत ना ब्वॉ ते कामुन नाही करून पाहात तुम्ही…..घरी बसुन तं करायचं बे…. त्यात एवढं काय आवघडबी नाहीनं….मंग मी काय मंतो ढमढेरे, तुम्ही झुंबाच करून पहा न ब्वा….आमच्या नागपुरात तं आजकाल लय लोक संत्र्याच्या खालोखाल झुंबाल माणुन राह्यलेत ब्वा….!” आपल्या तोंडातला खर्रा खाकरत खास नागपुरी लहेज्यात सदा नागपुरेनं आपलं मत मांडलं.
ईकडे खोलीत मी काय करावे व कसे करावे ही चर्चा चांगलीच तापु लागली.जो तो मोठमोठ्या आवाजात बोलु लागला.तिकडे आमचे दिवटे ढमढेरे गल्लीतलया पाच दहा पोरांना पुढ बसवुन आमच्या दवाखाण्यातल्या पराक्रमाबद्दल सांगत असावेत असे वाटले.तसेही त्यांना आमच्याबद्दल कधी आपल्या मित्रांना कधी काही सांगायला मिळाले नव्हते.बाकी सर्व मुलं आपापल्या बापांच्या नानाविध करामती सांगत.आपल्याला सांगायला काहीच नाही याचं शल्य आमच्या चिरंजिवांनी आत्तापर्यंत बाळगले होते.आज ते आपल्या छातीला आमच्या कुलनिशानी ढेरीच्या पातळीत फुगवत अभिमानाने बोलत होते.तर इकडे खोलीमध्ये आमच्या सौभाग्यवती आपल्या डोळ्यातून आसवांची टिपे गाळत गाळत खोलीमध्ये बसलेल्या समस्त हितचिंतकांचे सल्ले टिपत होत्या. एका क्षणाला आपलाच सल्ला कसा श्रेष्ठ हे पटवण्याच्या नादात खोलीमधील तापमान बरेच वाढले होते. शेवटी सर्व सहमतीने अण्णा तंतुरेचा सल्ला सोडून बाकीचे सर्व सल्ले स्वीकारण्याचे ठरलं सरदार बलवंत सिंग यांच्या म्हणण्यानुसार मी दररोज जिमला जायचं ठरवलं तर दररोज सकाळी दुधी भोपळ्याच्या ज्यूस सोबतच कारल्याचा ज्यूसही घ्यायचं ठरलं वैद्य वहिनींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सौभाग्यवतींनी विविध काढ्यांचा रेसिपी त्यांच्याकडून घेतला हे सर्व झाल्यानंतर आमच्याकडील बैठकीचा समारोप झाला आणि मी पलंगावर कलमडलो थोड्या वेळातच मला गार झोप लागली.
काल ठरवल्या प्रमाणे मी आज पाहाटेच जिम मध्ये आलो होतो.तिथे आलो तर पाहतोय तर काय हिऽऽ गर्दी होती.लोक खुपच हेल्थ कॉन्शियस का काय म्हणतात ना ते झाले होते अस मला जानवत होते.माझ्याप्रमाणेच सगळेजनच मस्तपैकी नवे ट्रॅकसुट आणि स्पोर्ट शुज घालुन आले होते. मी जिमच्या बाहेरच उभा होतो.मी आत डोकावुन पाहिले तर बहुतांशजन माझ्यासारखेच पोट सुटलेले आणि वय वाढलेले वयस्करच होते.मग आतली गर्दी पाहुन मी थोडावेळ बाहेरच थांबालो. जिमच्या बाहेर एका तगड्या बॉडिबिल्डराचा फोटो लावलेला होता.महिण्याभरात त्याने बॉडी बनवली होती म्हणे….! त्याचा ‘महिना बिफोर’ आणि ‘महिना आफ्टर’ असे पोस्टर चिकटविलेले होते. महिण्या आधी तो माणुस एकदम रेडक्यासारका दिसत होता आणि आत्ता मात्र चांगला सुडौल जंगली सांडासारका दिसत होता. मग मी पण त्याच्याकडे पाहुन स्वतःला त्या माणसाच्या जागी चिंतु लागलो.मलाही महिण्याभरत माझी बॉडी त्या माणसा सारखी दिसु लागली.मी त्या पोष्टरकडे पाहात असतांनीच माझ्या पाठीवर कुणाचा तरी हात पडला.मी गर्कन मागे वळुन पाहिले तर जिम ईंस्ट्रक्टर वाकडे होता.तो मला व्यायाम करायला शिकवणार होता.त्याच्या तिनजागी वक्र असलेल्या देहाकडे बघुन त्याचे आडनाव वाकडे का होते हे मला कळाले.असो,तर वाकडेच्या म्हणण्यानुसार मी जिममध्ये व्यायामासाठी गेलो.वाकडेने मला एका ट्रेडमिल समोर उभे केले.ते ट्रेडमिल केवळ धावण्यासाठीच नाही तर बहुपयोगी असे बनवलेले होते.तिथे डंबेल्स,वेटलिफ्टिंग,रनिंग,आदींची व्यवस्था होती.मी सुरूवातीला डंबेल्स उचलुन व्यायामाला सुरूवात केली,परंतु चार ते पाच वेळेस ते डंबेल वर खाली केले आणी माझ्या हातांनी माझी साथ सोडली असे मला जानवले.मग मी ट्रेडमिलवर रनिंगचा निर्णय घेतला.ईंस्ट्रक्टर लकडेने मला ट्रेडमिलची स्पीड किती ठेऊ असे विचारले.मी ही अति उत्साहाने त्याला टॉप स्पिड ठेवायला सांगितले.उत्साहाच्या भरात मी त्या मशीनच्या फिरणार्या मॅटवर पाय ठेवायला गेलो आणि धाडकन आपटलो.मी धाडकन त्या मशीनवरच आपटल्याने त्या मशीननेही दम तोडला.माझ्या दोन्ही गुढग्यांना मार लागला होता.आपण आणि ती मशीन एकमेकांसाठीच बनलेले आहोत यावरचा माझा विश्वास त्या क्षणीच संपला.त्यादिवशी जिममध्ये ठेवलेले माझे पहिले पाऊल आखरीचेच ठरले.मी लंघडतच जिममधुन घरी आलो ते परत कधीच जिमची पायरी न चढण्याच्या ईराद्यानेच…!
घरी आल्यावर सौभाग्यवतींनी मला भलामोठा ग्लास भरून दुधी भोपळ्याचा व कारल्याचा ज्युस प्यायला दिला.तो ज्युस पितांना मला सारख्या कारले बाई आणि काळभोर बाईंचा माझ्यावर सुड उगवत हसणारा चेहरा दिसत होता.मी कसेबसे दोन तिन घोट पिले आणि मला एक भयंकर ओकारी येवुन मी तिथेच भडाभड वकलो.हे काही आपल्याला माणवणार नाही याची मला जिमनंतर लागलीच खात्री झाली होती.जिमवरून आल्यानंतर सकाळी आठ वाजताचा झुंबाचा ऑनलाईन वर्कआऊट होता.आत्ता माझी काही ईच्छा नव्हती परंतु बायकोच्या धाकाने मी ती बॅच ऑनलाईनलाच जॉईन केली. सुरूवातीला हळुहळू झुंबा करा असे एक सुडौल व शिडशिडीत बांध्याची तरूणी सांगत होती.मी त्या झुंबानाचातील तरूनिंचा नाच व हालचाली पाहुन भलताच चेकाळलो आणि मी ही त्यांच्याप्रमाणेच वेगवान हालचाली करत भान सोडुन माझे अगडबंब शरीर घेऊन नाचायला लागलो.या गडबडीत मघा जिममध्ये ट्रेडमिलवर धावतांनी पडल्याने गुडघ्यांना झालेली दुखापतच मी विसरून गेलो होतो.आणि अचानक एकाक्षणी अतिभारीय तानाने माझ्या गुडघ्यांनी माझी साथ सोडली व मी झुंबा करता करताच मटकन खालीच बसलो.मग कसेतरी माझे अवजड शरीर संभाळत मी माझ्या शयनगृहात गेलो आणि पलंगावर अक्षरशः स्वतःला झोकुन दिले.
मी एकदम स्वप्नातच गेलो.एक महीना झुंबा आणि जिममध्ये वर्कआऊट केल्याने माझ्या दंडातील बेंडकुळ्या आत्ता चांगल्याच फुगल्या होत्या.विवीध काढे,ज्युस आणि प्रोटीन शेक घेऊन माझे शरीर चांगलेच तरतरीत व जवान दिसत होते.ते बघुन मग माझी बायको माझ्या दंडांच्या बेंडकुळ्यांवर प्रेमाने हात फिरवत माझ कौतुक करत होती आणि आमचे दिवटे चिरंजीव शेजारच्या आगलावेच्या कारट्यालं माझी भिती दाखवत होतं.मी ऑफिसला निघालो तर शेजारची आगलावे बाई आणि दुसर्या दोन तिन बायका माझ्याकडे टक लावुन पाहात होत्या.मी तर एकदम खुशित होतो.मस्त लिननच बॉडीफिट फॅन्सी हाप शर्ट,वुडलॅंडचा बुट आण रेबॅनचा गॉगल डोळ्यावर चढवुन त्यांच्याकडे ध्यानही न देता माझ्या बुलेटवर बसुन ऑफीसला निघालो होतो.तेवढ्यात आमच्या चाळीतलीच नखरेल स्विटी “हॅलो,हॅंडसम” म्हनत माझ्याजवळ आली.मी काय तिला फारसा भाव देत नव्हतो,पण तीच आत्ता माझ्याशी लगट करायचा प्रयत्न करीत होती.तिचे कॉलेज ऑफिसच्या रस्त्यानेच होते.तिने मला “मला कॉलेजला सोडा ना गडे…! ” अस लाडीकपणे म्हटले.मग मी ही तिला माघच्या सिटवर बसायला सांगितले.ती माझ्या गाडीवर आशी चिकटुन बसली होती की गल्लीतल्या सगळ्या थोराड बायका मला व स्विटीला बघुन जळुन खाक होत होत्या. मग मी ही स्विटीला मोठ्या ऐटीने गाडीवर घेऊन ऑफिसला निघालो.स्विटीचे कॉलेज मध्येच येत असल्याने मी तीला कॉलेजला सोडले.मी स्विटीला तिच्या कॉलेजमध्ये सोडत असतांनी तिच्या दोन चार कॉलेज कुमारीका मैत्रीणी माझ्या गाडीजवळ आल्या.“हाय हॅंडसम” असे म्हणत असतांनीच त्या स्विटीला बघुन म्हणाल्या की,“काय गं स्विटी,तु तर खुपच हॅंडसम बॉयफ्रेंड गटवलास हां……!” स्विटी यावर काहीच न बोलता खाली बघत लाजली.त्या माझ्याकडे बघुन असे म्हणत असतांना त्या स्विटीवर जळत आसल्याचा मला भास झाला होताच.मला तिथे त्या कॉलेज कुमारीका बोलत असतांनी काही कॉलेजकुमारांनी पाहिले होते आणि ते ही माझ्याकडे बघुन खुन्नस देत होते.त्यांची ती खुन्नस बघुन माझ्या बाहु फुरफुरायला लागल्या आणि तट्टकन माझ्या बाहु फुगुन अंगावरील शर्ट फाटले.अचानक हवेची एक झुळुक आली आणि माझ्या शरीरावरील शर्ट हवेत उडुन गेले.माझी ती बॉडी बघुन ते टुकार कॉलेजकुमार पळुन गेले तर मुली माझ्याभोवती गलका करत डोळ्यांची पापणीही न लवु देता माझ्याकडे बघत होत्या.मी स्टाईलमध्ये रेबॅनचा गॉगल डोळ्यांवर चढवुन तेथुन निघालो आणि थेट ऑफीसलाच गेलो.तिथे मला पाहाताच आमचा शिपुरडा पांचाळ मला बघताच ताडकण जाग्यावरून उठुन मला नमस्कार करता झाला.मी त्याच्याकडे लक्षही न देता ताडताड चालत जाऊन माझ्या टेबलवर बसलो.आज ऑफिसमधील सर्व स्री कर्मचारी माझ्याकडेच एकटक्क नजरेने पाहात आसल्याचा मला भास होत होता.तेवढ्यात शेजारच्या टेबलवरची ज्युली माझ्याकडे आली’.हॅलो’पॅडी’ म्हणत मला काहीतरी बहाण्यानं फाईल दाखवत क्युरी विचारत होती.हे विचारतांनी मध्ये मध्येच ती माझ्या दंडाच्या बेंडकुळ्याना हलकासा हात लावत स्पर्श करत होती.ऑफीसामधले सगळे पुरूष माझ्यावर जळत होते.माझे तर जिवणच बदलले होते.तेव्हड्यात आमच्या ऑफिसमध्ये दोन चार गुंड घुसले आणि ते खंडणीसाठी ऑफीसमध्ये तोडफोड करू लागले.हे बघुन मला राहवले नाही.मी ताडकण उडी मारून त्या गुंडांच्या पुढे गेलो आणि त्या गुंडांना बुकलुन काढु लागलो.
“ अहो,उठा.लवकर उठा,आणि हे काय मेल लक्षण लावलय.कुणाला झोपेत मारत आहातं,आणि काय बडबडताय तुम्ही….!” आणि दुसर्या क्षणाला मी उठत नाही हे पाहून सौ.नी माझ्या अंगावर भडभड पाण्याची बाटली रिकामी केली,झोपेत का होईना पण मला बॉडी बिल्डरचा फिल आला होता,परंतु हे आमच्या सौं.ना देखवले नाही आणि तिने माझ्या या स्वप्नांवर पाणी फेरले होते.
आत्ता हे काय नविनच खुळं काढलय म्हनुन ती आक्रस्ताळेपणानं माझ्याकडे पाहात होती.तेव्हड्यातच आमच्या भिंतीलाकायमच कान चिकटवुन असणारे आमचे शेजारी तिथे जमले.शेजारच्या आगलावेबाई माझ्याकडे बघुन ‘काय बाई बावळं ध्यान हे’ अस म्हणत असाव्यात अस वाटलं.आमच्या गल्लीतली नखरेल कॉलेजकुमारी स्विटी माझ्याजवळ येत “काय अंकल,जिम लावली वाटतं” असं उपहासाने म्हणत कुचाळपणे हसत होती.तिकडे आमचे बाटुक चिरंजीवांना आगलाव्याचे पुंड कुलदिपक बखुटीला धरून कुटत होते.आमचे छोटे ढमढेरे केविलवाना चेसरा करत रडत रडत त्याला “मी माझ्या पप्पांनाच सांगतो असे म्हणत होते तर ते माज आलेलं आगलाव्याच कार्ट उद्दामपणे माझ्याच मुलाला म्हनत होते की,“सा़ंग बे, माझे काय वाकड करणार आहे तुझा ढेरपोट्या बाप ते पाहतोच” असे म्हणत होते. मी आपला मुकाटपणे हिन दिन भावनेन घरात बसलो होतो.पुढचे पाच दहा दिवस काय ऑफीसला जाणच झालं नाही.या दरम्यान आमच्या सौ.नी माझ्यावर वजन कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले.त्या प्रयोगांची दाहकता पाहुन मग वजन कमी करायच आणि बॉडी बनवायच भुत माझ्या डोक्यातुन पार निघुन गेल होतं…..!!!
-गोडाती बबनराव काळे, लातुर
9405807079
Leave a Reply