मुलांनो तुम्ही लहानपणी तुमच्या घराच्या भीतीवर रेघोट्या मारलेल्या असतील आणि त्यामुळे त्यावेळी घरच्यांचे धपाटेही खाल्ले असतील परंतु जो काही रेघोट्या मारण्याचा नाद किंवा भिंतीवर चित्र काढण्याचा उद्योग तुम्हांपैकी अनेकांनी केलेला असेल. परंतु ठाण्यात १९६५ साली जन्माला आलेल्या शैलेश सरानी मात्र त्यांचा हा नाद , हा छंद अत्यंत उत्तमपणे लहानपणापासून जोपासला . त्यांनी पण लहानपणी भिंतीवर चित्रे काढून घरच्यांचा ओरडा खाल्ला होता. त्याबद्दल त्यांनी एक वेगळी कविता लिहिली आहे जरूर वाचा.
” भिंत
मला भिंत आवडते.
कशीही असली तरी.
अगदी लहान पणा पासून.
शाळेत असताना मी भिंतीजवळच्या बाकावर, भिंतीच्या बाजूला बसायचो. का, ते नाही सांगत येणार.
पण खांद्याला खांदा लावून ती असली की आधार वाटायचा. शाळेत भिंतीकडे तोंड करून (वर्गाकडे पाठ) उभं राहण्याची शिक्षा करत. ही माझी सर्वात आवडती शिक्षा. अगदी तास संपेपर्यंत, सगळा वर्ग फळ्याकडे न पाहता माझ्याचकडे पहात आहे असं वाटत असे.
मला खूप काही दिसायचं त्या भिंतीवर अगदी चित्रपट पहिल्या सारखं. अचानक वर्गातील शिक्षक कोणावतरी मोठ्या आवाजात डाफरत. त्यावेळी मला खूप राग यायचा. माझी तंद्री तुटायची. थोड्याच वेळात मी परत भिंतीत शिरायचो. इतिहासातील अनेक युद्ध मी भिंतीवर पहिली, आणि आग्र्याहून सुटकेच्या वेळी पहिल्या पेटार् यात बसणारे शिवराय, मधले दोन पेटारे सोडून तिसऱ्या पेटार्यात त्याच हिमतीने सराईतपणे लपणारे छोटे शम्भू राजे पण.
घरी अभ्यास करताना पण मला भिंतीला टेकून बसायला आवडे. झोपताना भिंतिच्या कडेला झोपत असे. पुन्हा चित्र आणि चित्रपट झोप लागेस्तोवर साथ देत.
ही भिंतच माझ्या पुढील आयुष्यात सोबत करेल असे कधीच वाटलं नव्हतं. बाल वयात दिसणारी अदृश्य चित्रं आता दृश्य स्वरूपात साकारताना, भिंती कडे तोंड असताना आता खरंच असं घडत की सगळे माझ्याच कडे पहात असतात हातची काम सोडून. खूप आनंद होतो.
मी व्यवसाय म्हणून काही काम , कष्ट करत आहे असे कधी जाणवतच नाही. ”
त्यांनी लहानपणी भिंती रंगवल्या परंतु शाळेत असताना खरोखर कागदार चित्रे काढावयास सुरवात केली. ठाण्याच्या मो. ह . विद्यालयात ते शिकत असताना त्यांच्या चित्रकलेच्या पितळे सरानी त्यांना प्रोत्साहन दिले. शाळेत असताना त्यांच्या पितळे सरांनी त्यांना अनेक स्पर्धातून भाग घेण्यास सांगितले , शैलेश सरानी तेव्हा अनेक वेळा बक्षिसे मिळवली , त्यांना बक्षिसे मिळवण्याचा इतका नाद निर्माण झाला आणि पितळे सरांना त्यांना त्या स्पर्धेपासून रोखावे लागले.
पितळे सरांनी एक गोष्ट त्यांच्या मनात शाळेत असताना ठसवली होती ती म्हणजे तू बक्षिसासाठी चित्रे काढू नकोस तर स्वतःला मिळणाऱ्या आनंदासाठी चित्रे काढ. त्यांच्या बहिणीला मात्र शैलेश सरांनी चित्रकलेच्याच क्षेत्रात आपले करिअर करावे असे वाटले आणि त्यांच्या सांगण्यामुळे शैलेश सरानी जे.जे. स्कुल ऑफ अप्लाईड मध्ये प्रवेश केला तेथे शैलेश सरानी पाच वर्षे शिक्षण घेतले.
मुलांनो , त्यांना चित्रे काढून विकण्याचा व्यवसाय करताही आला असता परंतु त्यांच्यामध्ये एक शिक्षक जागा होता . आपण मुलांसाठी काहीतरी करावे हीच इच्छा त्याच्या मनामध्ये होती तरी पण जगण्यासाठी पैसे लागतात म्हणून त्यांनी मुलांच्या शाळांच्या भीती रंगवणे , मुलांचे शाळेमधील वर्ग आकर्षित व्हावे आणि मुलांना तेथे अभ्यास करण्यात मजा येईल ह्या विचाराने त्यांनी अनेक मोठमोठ्या शाळेमधील वर्ग तयार केले . उत्तम उत्तम चित्रे काढली, आणि शाळेमधील वर्गाना आकर्षक रूप दिले. अर्थात अनेक जणांना अशा आकर्षक दिसणाऱ्या वर्गामध्ये शिकण्याचा मोह झाला. सुरवातीला अनेकांना वेगळे वाटले परंतु नंतर मात्र त्याच्या ह्या कलेची कीर्ती अनेक ठिकाणी गेली आणि त्यांना त्यासाठी निमंत्रणे येऊ लागली.
तर मुलांनो लहानपणी लागलेला असा भीती रंगवण्याचा छंद त्यांनी जोपासला परंतु तो जोपासताना त्यांनी त्याचे शास्त्रोक्त शिक्षणही घेतले म्हणून ते मोठं मोठी कामे करू लागले. त्यामुळे त्यांच्यामधील केलेचा बोलबाला दूरवर पसरला. त्यांनी त्याला व्यावसायिक सवरून दिले आणि ते यशस्वी झाले . त्याच्याकडे सतत कामे येऊ लागली , आजही त्यांच्याकडे खूप कामे आहेत प्रसंगी वेळेमुळे त्यांना नाही म्हणावे लागते. अनेक वेळा त्यांनी मोठमोठ्या हॉलटेल्स मधील भितीवरही चित्रे काढली आहेत आणि काढत आहेत. त्यांनी घरांचे दरवाजेही आकर्षकपणे रंगवले आहेत , खिडक्याही रंगवूंन आकर्षक केलेल्या आहेत. बरेच वेगवेगळे प्रयोग त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून केलेलं आहेत.
तरीपण त्यांच्यामधील शिक्षक त्यांना स्वस्थ बसून देत नवहता. ठाण्यामधील भिंती रंगवा आणि ठाणे सुंदर करा या उपक्रमांत शैलेश सरानी आणि त्यांच्या टीमने काम केले . तर ठाण्यामधील गतिमंद मुलांसाठी असलेल्या विश्वास ट्रस्ट मधील मुलांसाठी ते काम करतात. त्यांना चित्रकला शिकवतात आणि त्यांना ते सक्षम करतात. ती गतिमंद मुले दिवाळीच्यावेळी कंदील करतात , ग्रिटींग कार्ड करतात . अक्षरशः त्या मुलांनी केलेल्या वस्तुंना आज खूप मोठी मागणी आहे. हा आगळ्यावेगळ्या उपक्रमामागे शैलेश सरांचा हात आहे.
चित्रकलेचे काम करताना त्यांना सामाजिकतेचे भान आहे परंतु त्यांना व्यवहाराचे भान आहे कारण जर काम करत असेल आणि त्यातून उपजीविकेसाठी काही मिळत नसेल तर तो चित्रकार जगणार कसा , खाणार काय ? ह्याचेही त्यांना भान आहे आणि मुलांना चित्रकला शिकवताना या व्यवहाराचेही भान ठेवा हे ते आवर्जून सांगतात. आज चित्र कुणीही काढते असा समज झाला हे परंतु ते तसे नाही. ते लोकांना आवडले तरच ते तुम्हाला बोलावतात आणि तुमचे काम उत्तम असेल तर तुम्ही सांगाल तो मोबदला ते देतात. अर्थात असे बरे वाईट अनुभ शैलेश सरांना आलेले आहेत आणि पुढेही येतील.
शैलेश साळवी यांनी अनेक चित्रेही काढली आणि त्याची प्र्दशने आजपर्यंत अनेक ठिकाणी झालेली आहेत. त्यांनी स्वतःचा एक स्टुडिओ अविष्कार नावाचा स्टुडिओ ठाण्यात उभारला असून तेथे त्याची चित्रे आणि कलाकृती मिळतात तसेच तेथे ते अनेक मुलांना चित्रकलेचे धडेही देतात. मुलांनो तुम्ही एक लक्षात ठेवा शिक्षण तर हवेच परंतु त्या जोडीला एखादी कला असेल तर आयुष्यात खरी मजा असते ,आनंद असतो. तुम्ही शिकून पैसे तर कमवणार आहेच परंतु पुढे पुढे त्याचा कंटाळाही येण्याची शक्यता असते जर चित्रकेची कला तुमच्याकडे असेल तर ती डेव्हलप करून तुमहाला त्यातूनही पैसे आणि कामही करता येते आणि मनासारखे आयुष्य आनंदात जगता येते .
मग तुम्ही शैलेश सरांसारखे करणार नाही, मी म्हणतो कराच बघा जगण्यात एक वेगळा नंद निर्माण होईल आणि त्याचबरोबर प्रत्येकाला आवडते ती प्रसिद्धीही मिळेल. मोठमोठे लोक तुम्हाला कलाकार म्हणून ओळखतील आणि तुमच्या जगण्याला वेगळा अर्थ निर्माण होईल. आज कोरोनाच्या काळातही त्याचे काम चालू आहे, हे महत्वाचे.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply