विष्णूंच्या दश अवतारातील पाचवा अवतार वामन. हा भाद्रपद शुद्ध द्वादशीला मध्यान्हकाळी श्रवण नक्षत्रावर झाला. म्हणून या दिवशी वामन जयंती साजरी करतात. या तिथीला काही भागात वामन द्वादशी असेही म्हणतात.
हा अवतार इंद्राच्या संरक्षणासाठी आणि कळी नावाच्या राक्षसाचे निर्दालन करण्यासाठी झाला.
वामनाच्या ध्यानाचा व प्रार्थनेचा मंत्राचा अर्थ असा – अजिन, दंड, मेखला, कमंडलू यांनी ज्याची मूर्ती शोभत आहे, ज्याने त्रैलोक्य व्यापले आहे, शत्रूंना जिंकले आहे व वेदवाणीत पटू आहे अशा वामनाला माझा नमस्कार असो.
धर्मसिंधुत वामन पूजनाचा मंत्र सांगितला आहे-
‘“देवेश्वराय देवाय देवसंभूतिकारिणे । प्रभये सर्व देवानां वामनाय नमो नम:”
Leave a Reply